वनशेत येथे चोरी करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: January 28, 2017 02:55 IST2017-01-28T02:55:20+5:302017-01-28T02:55:20+5:30

रोहा तालुक्यातील भालगाव या गावातील वनशेत येथील नामदेव शिंदे यांच्या घरी चोरट्याने दागिन्यांसह रोखरक्कम चोरु न नेली.

Theft of a person who was stolen in Vanshat | वनशेत येथे चोरी करणाऱ्यास अटक

वनशेत येथे चोरी करणाऱ्यास अटक

आगरदांडा : रोहा तालुक्यातील भालगाव या गावातील वनशेत येथील नामदेव शिंदे यांच्या घरी चोरट्याने दागिन्यांसह रोखरक्कम चोरु न नेली. त्या चोरट्याविरोधात मुरु ड पोलीस ठाण्यात रीतसर तक्र ार नोंदविण्यात आली.
नामदेव शिंदे घराला कुलूप लावून भालगाव एसटी स्टॅन्ड येथे गेल्या असता चोरट्याने घराची खिडकी उचकटून घरात आत प्रवेश के ला. हॉलचे भिंतीमध्ये कडी नसलेल्या लाकडी कपाटात लॉक करु न ठेवलेली पत्र्याची पेटी त्यामध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे झुमके, दोत अंगठ्या, नथ व रोख सात हजार रु पये चोरी करु न पळून गेला. यांची नोंद मुरु ड पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने मुरु डचे पोलिस निरीक्षक रमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विष्णू बेनारे, पोलीस नाईक निलेश गिरी व पोलीस नाईक राहुल थळे हे घटनास्थळी पोचून रितसर चौकशी केली. फिर्यादी नामदेव शिंदे यांच्या घरी अगोदर काम करणाऱ्या भरत भिकू कोळी (रा. भालगाव आदिवासी वाडी) यांची चौकशी केली असता सकारात्मक उत्तर न मिळाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत चोरी गेलेला रोख रक्कमेसह दागिने पोलिसांनी हस्तगत केले. (वार्ताहर)

Web Title: Theft of a person who was stolen in Vanshat