चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटक
By Admin | Updated: January 10, 2017 06:08 IST2017-01-10T06:08:35+5:302017-01-10T06:08:35+5:30
कर्जतच्या रेल्वेस्टेशन बाजूला भिसेगाव हद्दीत २७ डिसेंबरला सायंकाळी ७ वा. एका घरातून एक लाख सत्तर हजार रुपये चोरीला गेल्याची

चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटक
नेरळ : कर्जतच्या रेल्वेस्टेशन बाजूला भिसेगाव हद्दीत २७ डिसेंबरला सायंकाळी ७ वा. एका घरातून एक लाख सत्तर हजार रुपये चोरीला गेल्याची तक्र ार कर्जत पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक के ली आहे.
घरमालक आबा तावडे (६८) हे एकटेच राहत होते. घरकाम होत नसल्यामुळे मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी रूपा पाटील खरे नाव सविता (मूळगाव भुसावळ) या महिलेस घरकाम करण्यासाठी ठेवले होते. आबांच्या प्रेमळ स्वभावाचा फायदा घेऊन देवाजवळ ठेवलेले एक लाख सत्तर हजार रु पये घेऊन पोबारा केला. घटनेचे गांभीर्य पाहता, कर्जत पोलीस निरीक्षक निजामुद्दीन मुल्ला, तसेच पोलीस कर्मचारी सचिन म्हसकुटे, गणेश सानप यांनी योग्य दिशेने सूत्रे वर्तवून आबा तावडे यांच्याकडील काम करणाऱ्या महिलेचा फोन नंबर स्ट्रेस करून सिंहगड किल्ल्याचा पायथ्याशी असलेल्या डोंजे गावातून या महिलेला अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)