शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

रायगड, महाड अन् दुर्घटना; रायगडवासीयांची जखम जुनी, घाव नवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 10:06 IST

खालापूरजवळील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर दासगाव, सावित्री पुलाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या

माधवी यादव-पाटील

नवी मुंबई : पावसाचे तांडव, काळीज चिरणाऱ्या दुर्घटना अन् मृतदेहांचे ढिगारे हे अलीकडे रायगड आणि पावसाळ्याचे जणू नवे समीकरणच तयार झाले आहे. दासगाव, सावित्री पूल, तळीये, तारिक गार्डन या जुन्या जखमा अद्याप भरून निघालेल्या नसतानाच बुधवारी, १९ जुलैला पुन्हा एकदा खालापूरजवळील कर्जत तालुक्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली सापडले. रात्रीच्या अंधारात दरडीखाली संपूर्ण गाव गाडले गेले. काही कळण्याआधीच अनेकांना मृत्यूने गाठले.

महाड तालुक्यात २८ वर्षांपूर्वी पारमाची गावात दरड कोसळली होती. त्यानंतर महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या गावात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले ते आजअखेर कायम आहे.

 महाड तालुक्याला २००५ ला महापुराने वेढा घातला होता. २६ जुलै २००५ ला तालुक्यातील दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन या गावात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये १९४ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो बेघर झाले होते. यावेळी एकट्या दासगाव भोईवाड्यात अचानक दरड कोसळली. या दरडीखाली ३८ घरे भुईसपाट झाली. यात ४८ जण मृत्युमुखी पडले. तालुक्यातील सह्याद्री वाडी, हिरकणी वाडी, पारमाची, माझेरी या गावांतून जमिनीला भेगा पडल्या.

 सावित्री आणि काळ नदी २ ऑगस्ट २०१६ या अमावास्येच्या रात्री जणू काळाचे रूप घेऊन धोक्याच्या पातळीबाहेर वाहत होत्या. रात्री साडेअकराला पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि पाहता पाहता सावित्री नदीवरील जुना पूल भुईसपाट झाला. मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवरील  ब्रिटिशकालीन पूल कोसळून पुलासोबत अनेक जण वाहून गेले. क्षणात अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा या गाड्यांसह ४० जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले.

 २४ ऑगस्ट २०२० ला सायंकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात १६ जण मृत्युमुखी पडले, तर नऊ जण जखमी झाले. महाडमधील काजळपुरा परिसरातील ही इमारत आहे. या इमारतीत ४७ फ्लॅट होते, तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० रहिवासी अडकले होते. 

 पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे २२ जुलै २०२१ ला रात्री दहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन कोसळलेल्या दरडीखाली सुमारे १६ घरे भुईसपाट झाली. आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले होते, केवनाळे येथे सहा जणांचा मृत्यू, आठ जखमी झाले. रायगड जिल्ह्यात २२ जुलै २०२१ ला धो धो पाऊस आणि नद्यांना आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचवणारा प्रत्येक जण उघड्या डोळ्याने घराचे होणारे नुकसान पाहत असताना दुपारी चारच्या सुमारास महाड तालुक्यातील एका गावावर दरड कोसळली अन् तळीये हे डोंगराखाली गडप झाले. तब्बल ८७ लोकांचा जीव गेला.  

टॅग्स :RaigadरायगडRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणmahad-acमहाड