म्हसळा : दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चांदोरे गावाजवळ (ता. म्हसळा) रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास एका कारने पेट घेतला. या घटनेत पाच मिनिटांत कार जळून खाक झाली. या घटनेनंतर प्रसंगावधान दाखवत कारमधील पाचही पर्यटक बाहेर पडले.
पुणे येथील स्मिता पवार यांच्या मालकीची ही कार होती. पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी या घटनेची माहिती म्हसळा तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रोहिंणकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पर्यटकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र पाचच मिनिटांत कार जळून खाक झाली.