वार्षिक देखभालीसाठी किल्ले रायगडावरील रोप वे ५ दिवसांसाठी राहणार बंद

By राजेश भोस्तेकर | Updated: March 11, 2023 12:02 IST2023-03-11T12:02:08+5:302023-03-11T12:02:36+5:30

छत्रपती शिवाजी महाराज याच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडला लाखो शिवभक्त तसेच पर्यटक भेट देत असतात.

The ropeway at Raigad fort will be closed for 5 days for annual maintenance | वार्षिक देखभालीसाठी किल्ले रायगडावरील रोप वे ५ दिवसांसाठी राहणार बंद

वार्षिक देखभालीसाठी किल्ले रायगडावरील रोप वे ५ दिवसांसाठी राहणार बंद

अलिबाग - किल्ले रायगडावर जाण्यासाठी असलेला रोप वे हा १३ ते १७ मार्च या कालावधीत वार्षिक तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याचे रायगड रोप वे प्रशासनाने निवेदन पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे किल्ले रायगडवर येणाऱ्या पर्यटकांना आता पायी गडावर जावे लागणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज याच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडला लाखो शिवभक्त तसेच पर्यटक भेट देत असतात. किल्ले रायगडावर जाण्यासाठी पायी तसेच रोपवे द्वारे जाता येते. रोपवे ने किल्ले गडावर जाण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. जेष्ठ नागरिकांना हि या रोप वे मुळे किल्ले रायगड वर जाण्यास लाभ होत असतो.

रायगड रोप-वे वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी दिनांक १३ मार्च ते १७ मार्च २०२३ ह्या कालावधीत बंद राहील. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रोप-वे प्रशासनाकडून हे निवेदन पत्रकाद्वारे देण्यात आले आहे. अशी माहिती प्रकल्प प्रबंधक राजेंद्र खातू यांनी दिली आहे.

Web Title: The ropeway at Raigad fort will be closed for 5 days for annual maintenance

टॅग्स :Raigadरायगड