शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

भक्ष्याच्या शोधातील बिबट्याच झाला भक्ष्य, रानटी डुकरांसाठी लावला होता फास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 07:29 IST

रानटी डुकरांसाठी लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुरूड जंजिरा : भालगाव परिसरातील जंगल भागात रानटी डुकरांसाठी लावलेल्या फासात अडकून चार वर्षांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बिबट्याचे वजन ४५ किलो इतके आहे. मंगळवारी सकाळच्या दरम्यान एक बिबट्या फासात अडकल्याची माहिती प्रादेशिक वन विभागास मिळाली. त्यानंतर सर्व वरिष्ठ वनाधिकारी या ठिकाणी पोहचून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र, सर्व यंत्रणा पोहचेपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला.

भालगाव गावापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या जंगल भागात हा बिबट्या रानटी डुकरांसाठी लावण्यात येणाऱ्या फासात अडकला होता. दुचाकी गाड्यांना वापरण्यात येणारी वायर या फासासाठी वापरण्यात आली होती. फणसाड अभयारण्य परिसरात अनेक बिबटे आहेत. यातील एक बिबट्या भक्ष्य शोधत असताना फासात अडकला. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींनी  संताप व्यक्त केला असून, फास लावणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय सांगळे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून आपला अहवाल वनाधिकारी यांना दिला आहे.

वन विभागाला ही माहिती मिळताच बिबट्याला वाचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोहचलो होतो.  बिबट्या हा चार वर्षांचा होता. भालगाव प्रादेशिक विभागात बिबट्याचा मृत्यू झाला आहे. - मनोज वाघमारे, वन परिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगलforest departmentवनविभाग