शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये ‘वंचित’ची उमेदवारी, कोणाची डोकेदुखी ?

By राजेश भोस्तेकर | Updated: April 13, 2024 09:15 IST

इंडिया आघाडीतर्फे उद्धव सेनेकडून अनंत गीते तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

राजेश भोस्तेकर

अलिबाग : रायगडलोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराची घोषणा करीत सुनील तटकरे व अनंत गीते यांची डोकेदुखी वाढवली आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘वंचित’ने उमेदवार देत २३ हजार १९६ मते मिळवली होती. त्यामुळे हा फॅक्टर यावर्षी कोणाच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

इंडिया आघाडीतर्फे उद्धव सेनेकडून अनंत गीते तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. गीते यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी मित्रपक्ष त्यांच्या प्रचारात अजून उतरलेले दिसत नाहीत. तर तटकरे यांनी उशिरा प्रचार सुरू केला असला तरी ते मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात अडकले आहेत.

 २०१४ मध्ये अनंत गीते २,११० मतांनी तर २०१९ मध्ये सुनील तटकरे ३१ हजार मतांनी विजयी झाले.  २०१४ च्या निवडणुकीत शेकापने रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती. त्यांना १,२९,७३० मते मिळाली होती.  २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना  २३,१९६ मते मिळाली होती.

 यंदाची निवडणूक तटकरे व गीते अशी दुरंगी लढत होईल, असे वाटत होते. मात्र, आता ‘वंचित’ने उमेदवारी घोषित करीत चुरस वाढवली आहे.  महाडच्या कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. चव्हाण या भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष असून, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रायगडमधून मराठा उमेदवार दिला आहे. 

टॅग्स :Raigadरायगडsunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४