भाऊ निघाले बहिणीच्या भेटीला मात्र वाहतूक कोंडीत अडकले; अलिबाग रेवदंडा रस्त्यावर वाहतूक कोंडी

By राजेश भोस्तेकर | Updated: October 26, 2022 14:31 IST2022-10-26T14:30:56+5:302022-10-26T14:31:19+5:30

कुरुळ रस्त्यावर वाहनाच्या दीड किमी रांगा

The brothers went to visit their sister for bhaubeej got stuck in a traffic jam; Alibag Revdanda road traffic jam | भाऊ निघाले बहिणीच्या भेटीला मात्र वाहतूक कोंडीत अडकले; अलिबाग रेवदंडा रस्त्यावर वाहतूक कोंडी

भाऊ निघाले बहिणीच्या भेटीला मात्र वाहतूक कोंडीत अडकले; अलिबाग रेवदंडा रस्त्यावर वाहतूक कोंडी

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग : दिवाळी सण सुरू असून आज बहिण भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला भाऊबीज सण साजरा होत आहे. यासाठी भाऊ हे बहिणीला भाऊबीज भेट देण्यासाठी निघाले आहेत. मात्र भाऊरायाना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करीत बहिणीचे घर गाठावे लागत आहे. अलिबाग रेवदंडा रस्त्यावर अलिबाग बायपास ते कुरुळ या दीड किमी रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

भाऊबीज सणसाठी तसेच पर्यटनसाठी नागरिक बाहेर पडले आहेत. वाहनाची संख्या ही रस्त्यावर वाढलेली आहे. अलिबाग रेवदंडा रस्त्यावरही वाहनाची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे अलिबाग बायपास ते कुरूळ या रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. दोन्ही बाजूला येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे भाऊबिजेला निघालेल्या भावाना बहिणीकडे पोहचण्यास वेळ लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे.

Web Title: The brothers went to visit their sister for bhaubeej got stuck in a traffic jam; Alibag Revdanda road traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.