शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

उत्तर रायगडात जमिनी खरेदी करण्याचे प्रमाण वाढले

By निखिल म्हात्रे | Updated: April 3, 2024 21:16 IST

जिल्ह्यात १२ लाख १२ हजार ५३६ दस्तांची नोंद : अलिबागसह उरण, पेण, पनवेल, कर्जतला पसंती

 अलिबाग : मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहर विस्तारल्यानंतर आता तिसरी नवी मुंबई म्हणून रायगड जिल्ह्यात विकासाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी रायगडकडे आपला मोर्चा वळवला आहे. यावर्षी रायगडमधील उपनिबंधक कार्यालयांत १२ लाख १२ हजार ५३६ दस्तांची नोंदणी झाली आहे. यातून ३ हजार २०६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा झाले आहे. यातही अलिबाग, उरण, पेण, पनवेल, कर्जत या तालुक्यांना अधिकची पसंती मिळत आहे.

कोरोनानंतर रायगड जिल्ह्यातील रियल इस्टेट क्षेत्रातील मंदी हळूहळू कमी होत आहे. वाढत्या महागाईमध्येही मालमत्ता खरेदीचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला २ हजार १३० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. तर यावर्षी ३ हजार कोटींचे, मात्र ३ हजार २०६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा झाले आहे. या आर्थिक वर्षाअखेर मुद्रांक शुल्क विभागाने १०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

यामध्ये एकट्या पनवेल विभागातील पाच उपनिबंधक कार्यालयांत १४०० कोटींपर्यंतचे मुद्रांक जमा झाले आहे. त्या खालोखाल कर्जत १४१ कोटी, अलिबागही १४० कोटी ७५ लाख तर खालापूर १३२ कोटींपर्यंत मुद्रांक जमा झाले आहे. उरणही पन्नास कोटींच्या पुढे आहे. अविकसित असलेल्या पोलादपूर, म्हसळा, तळा हे तालुकेही यात मागे राहिलेले दिसत नाहीत.

नवी मुंबई विमानतळ, सागरी सेतू व आता पनवेल, उरण व पेण तालुक्यांत होऊ घातलेले नवननगर आदी मोठ्या प्रकल्पांमुळे विकासाचे वारे या परिसरात वाहू लागले आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून या भागाला पसंती दिली जात आहे. अलिबागला तर पहिल्यापासूनच धनिकांनी पसंती दिलेली आहे.

कशातून मिळतो मुद्रांक शुल्क वस्तू व सेवा करानंतर सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग, अशी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क लागते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळतो. रेडिरेकननुसार ठरते मुद्रांक शुल्क -मुद्रांक शुल्क किती आकारणार, याबाबत काही मूलभूत नियम आहेत. यात किमान आणि कमाल जागेच्या आकारानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते. रेडिरेकनर दरावरून स्टॅम्प ड्युटी किती लागेल, हे कळू शकते. रेडिरेकनरच्या तक्त्यात मालमत्तेविषयी प्रतिचौरसमीटर काय दर आहे, त्यानुसार मुद्रांक शुल्क ठरते आणि आकारण्यात येते. दरवर्षी १ एप्रिल रोजी नवे वार्षिक बाजारमूल्य दर (रेडिरेकनर) लागू होतात. जे प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे असते. गतवर्षी दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जादा मुद्रांक शुल्क वसूल करण्याची कामगिरी रायगड जिल्ह्याने केली आहे. गेल्या वर्षी दोन हजार ४५ कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट होते. ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर सरकारने यंदा उद्दिष्ट वाढवून तीन हजार कोटी केले आहे. आतापर्यंत १०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. आगामी काळात अधिक उद्दिष्ट रायगड विभाग पूर्ण करेल.-श्रीकांत सोनावणे, सहजिल्हा निबंधक, रायगड 

टॅग्स :Raigadरायगड