शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

उरणमधील पुरातन देवीची मंदिरं विद्युत रोषणाईने उजळली; दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 20:19 IST

कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिराप्रमाणेच उरण शहर पासून ३ किमीच्या उरण-मोरा रस्त्यावरील डोंगरातील एका पाषाणी गुहेत श्री एकविरा देवीचे मंदिर आहे.

मधुकर ठाकूर

उरण - उरण परिसरात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी देवी, उरण शहरातील श्री शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील श्री  एकविरा देवी आणि जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत. जागृत, भक्तांच्या हाकेला धावून येणारी, भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांना पावणारी अशी देवींची ख्याती असलेल्या या चारही मंदिरात दर्शनासाठी परिसरातीलच नव्हे पंचक्रोशीतील हजारो भाविकांची नवरात्रीपासुनच  गर्दी उसळली आहे. श्री एकविरा देवी म्हणजे अवघ्या आगरी कोळ्याचीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिराप्रमाणेच उरण शहर पासून ३ किमीच्या उरण-मोरा रस्त्यावरील डोंगरातील एका पाषाणी गुहेत श्री एकविरा देवीचे मंदिर आहे. एका मोठ्या काळ्या कोरीव काम केलेले मंदिर आहे.या कोरीव मंदिरातील पाषाणातच श्री एकविरा देवी विराजमान झाली आहे.

पांडवकालीन हे देवीचे स्वयंभू मंदिर असल्याचे सांगितले जात आहे.मात्र एकवीरा देवीचे स्वयंभू मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.त्यामुळे वर्षभरात या ठिकाणी भाविकांची रेलचेल असतेच. त्याव्यतिरिक्त नवरात्रीत या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.

करंजा येथील कोळी आगरी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री द्रोणागिरी देवीचे दुसरे प्राचीन मंदिर आहे. द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत हे मंदिर आहे.हे मंदिर साधारणपणे ३५० वर्षांपूर्वीचे आहे.अरिष्टात भक्ताला स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यानंतर सापडलेल्या देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.तीच ही श्री द्रोणागिरी देवी होय. करंजावासियांचीच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविकांची आराध्य दैवत ठरली आहे.त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटक आणि भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.नवरात्रीत भाविकांची संख्या चौपटीने वाढते.

उरण शहरातील देऊळवाडी येथील उरणावती व शितला देवीचे आणखी एक पुरातन मंदिर आहे.सुमारे २५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे.उरणावती देवीच्या नावावरुनच शहराचे नावही उरण पडले असल्याचे सांगितले जात आहे. देवीच्या मंदिरासमोरच पाषाणी दिपमाळा आहे. दर वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला देवींचा उत्सव असतो. या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात आणि दर्शनाबरोबरच यात्रेचा ही आनंद लुटतात. 

उरण तालुक्यातील जसखार गावात पुरातन श्री रत्नेश्वरी देवीचे मंदिर आहे.देवी जसखार ग्रामस्थांची आराध्य दैवत आहे.जागृत देवीच्या दर्शनासाठी वर्षभरात भाविक येत असतात. सुमारे २०० वर्षापुर्वी एका भक्ताला मिळालेल्या दृष्टांतुन देवीची मूर्ती तलावात सापडली. त्यानंतर कौलारू मंदिरात रत्नेश्वरी देवीची स्थापना करण्यात आली होती.९ वर्षांपूर्वी या जुन्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्या जागी पावणे चार कोटी खर्चून भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. 

नवरात्रौत्सवात उरण परिसरातील ही चारही देवींची मंदिरे विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमही सुरू आहेत. त्यामुळे जागृत, भक्तांच्या हाकेला धावून येणारी, भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांना  पावणारी अशी देवींची ख्याती असलेल्या या चारही मंदिरात दर्शनासाठी परिसरातीलच नव्हे पंचक्रोशीतील हजारो भाविकांची नवरात्रीपासुनच गर्दी उसळली आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीuran-acउरण