धाटावमधील विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची वास्तू तीर्थक्षेत्र व्हावी
By Admin | Updated: May 9, 2017 01:22 IST2017-05-09T01:22:59+5:302017-05-09T01:22:59+5:30
रोहा तालुक्यात धाटावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आध्यात्मिक विचारांची परंपरा असलेल्या या गावात भाईसाहेबांनी पुढाकार घेऊन

धाटावमधील विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची वास्तू तीर्थक्षेत्र व्हावी
लोकमत न्यूज नेटवर्क
धाटाव : रोहा तालुक्यात धाटावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आध्यात्मिक विचारांची परंपरा असलेल्या या गावात भाईसाहेबांनी पुढाकार घेऊन श्रद्धेचे, भाविकतेचे मंदिर उभे केले. आता नव्याने या मंदिराची उभारणी केल्यानंतर अगदी सुसज्ज, सुंदर मंदिर बनविताना एकसंघपणे काम केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील आध्यात्मिक विचारांचा यथोचित सन्मान केल्यामुळे गावाच्या प्रगतीत भर पडून भविष्यात विठ्ठल रखुमाई मंदिराची ही मंगलमय वास्तू तीर्थक्षेत्र ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी केले.
सोमवारी धाटावमधील श्री गणेश, विठ्ठल रु क्मिणी व श्री हनुमंत या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासमयी ते बोलत होते. रायगड जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य-शिक्षण समिती सभापती भाई पाशिलकर, नवनिर्वाचित अध्यक्षा अदिती तटकरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत तटकरे, हभप नारायण वाजे महाराज, हभप पुरु षोत्तम पाटील महाराज, मधुकर पाटील,विजयराव मोरे, रोहा सभापती वीणा चितळकर, उपसभापती विजया पाशिलकर, दीपिका चिपळूणकर, रोहा इंडस्ट्रीजचे पी.पी.बारदेशकर आदी उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाबरोबर तालुक्याचा, गावाचा विकास होतो. तालुका पातळीपासून राज्यस्तरावर विविध योजनांतून सहभाग घेत यश मिळविलेल्या या ग्रामपंचायतीने अभियानात जिल्ह्यात प्रथम क्र मांक मिळविला आहे. गाव वाड्यांतून चांगल्या प्रकारे सहभाग, सहकार्य दिल्यामुळे विविध स्तरावर सन्मानित झालो आहोत. गावातील तरुणवर्ग क्र ीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक करीत असून धार्मिक कार्यातही एकसंघता दाखवीत असल्याबद्दल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले.