शाळांचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी शिक्षकांची
By Admin | Updated: September 5, 2015 22:59 IST2015-09-05T22:59:01+5:302015-09-05T22:59:29+5:30
राज्य शासनाने या वर्षात एक लाख शिक्षकांची भरती करण्याची केलेली घोषणा खोटी आहे. येत्या वर्षभरात अतिरिक्त ठरणाऱ्या दीड लाख शिक्षकांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू मात्र
शाळांचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी शिक्षकांची
रोहा : राज्य शासनाने या वर्षात एक लाख शिक्षकांची भरती करण्याची केलेली घोषणा खोटी आहे. येत्या वर्षभरात अतिरिक्त ठरणाऱ्या दीड लाख शिक्षकांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू मात्र त्यासाठी शिक्षकांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षणचा दर्जा उंचावण्याची गरज आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या प्रभावापुढे निभाव लागण्याकरता शिक्षकांनाच पुढाकार घ्यावा लागेल असेही तटकरे यांनी रोहा येथे सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रोह्याच्या डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात आमदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिशद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील, आमदार अनिल तटकरे, आमदार सुभाष पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, शिक्षण सभापती भाई पाशिलकर, अर्थ सभापती चित्रा पाटील, समाज कल्याण सभापती गीता जाधव, महिला बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत ओसवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आदी उपस्थित होते.
सुनील तटकरे यांनी म्हणाले, गावाचा मान पूर्वी हा त्या ठिकाणच्या केंद्र शाळेमुळे होता. आता या शाळांमधील पट कमी होत चालल्याने या शाळांचे महत्व कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली.
आमदार जयंत पाटील यांनी, सन्मानित झालेल्या शिक्षकांनी डॉ. चिंतामणराव देशमुखांच्या भूमीत सन्मान झाल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे सांगुन जिल्ह्यासह राज्यातील दीड लाख शिक्षक पुढील वर्षी अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावला तरच अस्तित्व टिकवता येईल याचे भान ठेवण्याचे आवाहन केले.
शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक आदर्श शिक्षकांसह जिल्ह्यात शालांत परिक्षांमध्ये प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आय.एस.ओ. मानांकम प्राप्त केलेल्या शाळांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक व अधिकारी उपस्थित होते.
$$्निजनता विद्यालयात कार्यक्रम
रसायनी : जनता विद्यालयात विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज प्रत्यक्ष करुन अध्यापनाची अनुभूती घेतली. अध्यापन, सभा, भाषणे, सूत्रसंचालन सर्व काही विद्यार्थ्यांनी केले. सभेमध्ये प्रथम डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रीफळ विद्यार्थ्यांनीच वाढविले.