The teacher barricaded himself with a knife | शिक्षिकेने स्वत:ला सुरीने भोसकले

शिक्षिकेने स्वत:ला सुरीने भोसकले

अलिबाग : पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून शाब्दिक चकमक झाली. याचा राग मनात धरून पत्नीने स्वत:च्या पोटात चाकू मारून घेतला. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. आत्महत्या की हत्या याबाबात अलिबाग तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा आहे.

पूनम अमित शर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. पूनम या अलिबाग येथील एका खासगी शाळेत शिक्षिका होत्या. अमित आणि पूनम यांच्यात सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून पूनम यांनी स्वत:च्या पोटात सुरी मारून घेतली. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन तत्काळ बेशुद्ध झाल्या. त्यांना पती अमित यांनी झिराड येथील रुग्णालयात आणले, मात्र प्रकृ ती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या वेळी उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पूनम यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: The teacher barricaded himself with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.