श्रीवर्धन नगरपालिकेची ७ लाखांची करवसुली
By Admin | Updated: November 13, 2016 01:16 IST2016-11-13T01:16:33+5:302016-11-13T01:16:33+5:30
जुन्या नोटा रद्द करण्याच्या घोषणेचा श्रीवर्धन नगरपालिकेला चांगला लाभ झाला आहे. विविध करापोटी ७ लाख ९ हजार ८८९ रुपये नगरपालिकेला प्राप्त झाले आहेत.

श्रीवर्धन नगरपालिकेची ७ लाखांची करवसुली
दांडगुरी : जुन्या नोटा रद्द करण्याच्या घोषणेचा श्रीवर्धन नगरपालिकेला चांगला लाभ झाला आहे. विविध करापोटी ७ लाख ९ हजार ८८९ रुपये नगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. पालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी राबवलेल्या वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पाणीपट्टी १ लाख १७ हजार १०० रु., घरपट्टी ४ लाख ३७ हजार १२३ रु., वृक्ष करापोटी १४ हजार १९ रु., रोजगार हमी करापोटी ३ हजार २९८ रु., पाणी
नळजोडणीपोटी १ हजार, पाणीपुरवठा अनामत रक्कम २४० रु., रस्ता खुदाई शुल्क १५०० रु., सरकारी शिक्षण करापोटी १ लाख २० हजार ६६८ रु. अशी रक्कम श्रीवर्धन नगरपालिकेला प्राप्त झाली आहे.
नोटा रद्द होणार असल्यामुळे श्रीवर्धन शहरातील बँकांमध्ये नोटांचा भरणा करण्यासाठी गर्दी जमली आहे. बाजारपेठेत व्यापारी वर्गाकडून मात्र ग्राहकांची लुबाडणूक सुरू आहे. ५०० रुपयांचा माल घेतला तरच ५०० रुपयांची नोट स्वीकारली जाईल, अशी अट दुकानदारांकडून घालण्यात येत आहे. (वार्ताहर)
पेट्रोल पंपासाठी अडवणूक
श्रीवर्धन तालुक्यातील पेट्रोल पंपावरही दुचाकीचालकांची अडवणूक सुरू आहे. सुटे पैसे नाही तर ५०० रुपयांचे पेट्रोल भरा,असे फर्मान पेट्रोल पंपमालकांनी काढल्याने चालक त्रस्त आहेत.