मुंबई-गोवा महामार्गावर टँकर-ट्रकची धडक

By Admin | Updated: June 15, 2016 03:22 IST2016-06-15T03:22:30+5:302016-06-15T03:22:30+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर जुन्या माणगावजवळ मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ट्रक व केमिकल टँकरमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर टँकरने अचानक पेट घेतल्याने

Tanker truck hits on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर टँकर-ट्रकची धडक

मुंबई-गोवा महामार्गावर टँकर-ट्रकची धडक

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर जुन्या माणगावजवळ मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ट्रक व केमिकल टँकरमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर टँकरने अचानक पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांनी, तसेच व्यापाऱ्यांनी आपली घरे, दुकाने उघडी टाकून पळ काढला.
आग विझविण्यासाठी रोहा औद्योगिक वसाहत, महाड औद्योगिक वसाहत, तसेच महाड नगरपालिका अग्निशमन दलाला तीन तासांनंतर यश मिळाले. हा केमिकल टँकर भरलेला आहे की, रिकामा हे निष्पन्न झाले नाही. मागे टाकीजवळ सील असल्याने भरलेला असल्याचा अंदाज व्यक्त केला. तीन तास उलटून गेले, तरी महाड, रोहा औद्योगिक वसाहतींमधून कोणतेच सुरक्षा पथक या ठिकाणी पोहोचले नव्हते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.
हा अपघात एवढा मोठा होता की, अचानक केमिकल टँकरने पेट घेतला. अपघात माणगावच्या भरवस्तीत झाला असून, काही वेळातच ट्रकमधून दोन स्फोट झाले. त्यामुळे संपूर्ण माणगांव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी काही क्षणातच महाड औद्योगिक वसाहत, रोहा औद्योगिक वसाहत, तसेच
महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने हजेरी लावत, तब्बल तीन तासांनंतर या आगीवर नियंत्रण आणले. (वार्ताहर)

Web Title: Tanker truck hits on Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.