नागोठणे येथे टँकर-ट्रेलर अपघात

By Admin | Updated: June 16, 2016 00:39 IST2016-06-16T00:39:53+5:302016-06-16T00:39:53+5:30

माणगाव येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातानंतर त्याचीच पुनरावृत्ती बुधवारी नागोठणेत झाली आहे. बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण फाट्यावर मुंबईच्या बाजूकडे

Tanker trailer accident at Nagothane | नागोठणे येथे टँकर-ट्रेलर अपघात

नागोठणे येथे टँकर-ट्रेलर अपघात

नागोठणे : माणगाव येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातानंतर त्याचीच पुनरावृत्ती बुधवारी नागोठणेत झाली आहे. बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण फाट्यावर मुंबईच्या बाजूकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने नागोठणेकडे जाणाऱ्या टँकरला धडक दिल्याने टँकरमधील रसायनाला गळती लागली होती. येथील रिलायन्सच्या अग्निशमन दलाने रसायनाची गळती थांबविली. अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला मुंबईच्या
रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.
पेण फाट्यावर मुंबईच्या बाजूकडे जाणाऱ्या ट्रेलरने (एमएच ०६ एक्यू ५४१५) समोरून येणाऱ्या कॉस्टिक सोड्याचे द्रव्य भरलेल्या टँकरला (एमएच ४३ वाय १५४५) धडक दिली. धडक देवून ट्रेलर रस्त्याच्या खाली उतरला, तर टँकरचे प्रचंड नुकसान झाले. ट्रेलचा मागील बाजूस सुद्धा फटका बसल्याने टँकरमधील रसायनाची गळती झाली. नागोठणे पोलिसांनी येथील रिलायन्सच्या अग्निशमन दलासह कंपनीच्या रासायनिक तज्ज्ञांना पाचारण केल्याने काही काळातच त्यांना रसायनाची गळती बंद करण्यात यश मिळाले. अपघातानंतर सोनू पांडे (२२, रा. दहिया, उत्तर प्रदेश) हा चालक टँकरमध्येच अडकून पडल्याने पोलिसांना टँकरची केबीन तोडून त्याला बाहेर काढावे लागले.

Web Title: Tanker trailer accident at Nagothane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.