Taliye Landslide: तळीयेमध्ये ८४ मृतांचे उत्तर कार्य; मृतांच्या १३ व्याला नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:03 PM2021-08-03T21:03:14+5:302021-08-03T21:03:41+5:30

महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले. मृत पावलेल्यांचे उत्तरकार्य आज गावात करण्यात आले.

Taliye Landslide 84 dead in Landslide Tears in relatives eyes | Taliye Landslide: तळीयेमध्ये ८४ मृतांचे उत्तर कार्य; मृतांच्या १३ व्याला नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

Taliye Landslide: तळीयेमध्ये ८४ मृतांचे उत्तर कार्य; मृतांच्या १३ व्याला नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रायगड ः महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले. मृत पावलेल्यांचे उत्तरकार्य आज गावात करण्यात आले. मृतांच्या नातवाईकांच्या डाेळ्यातून आजही अश्रूंचा बांध फुटला होता. त्यामुळे तळीयेमध्ये अत्यंत शाेकाकुल वातावरण हाेते.

22 जुलै राेजी तळीयेमध्ये अख्खा डाेंगर वाडीवर काेसळला आणि क्षणार्धात वाडीला गिळून टाकले हाेते. सरकार आणि प्रशासनाने बचाव कार्य हाती घेतले मात्र एकही जीवंत व्यक्ती सापडली नाही. 53 मृत देह शाेधण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरीत 31 नागरिकांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आला आहे. काही मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.तळीये दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले. मृत्यांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रिती रिवाजाप्रमाणे 84 मृतांचे 13 व्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांना दुःख अनावर हाेत हाेते. तसबीरे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या भावनेने त्यांनी हंबरडा फाेडला. तळीये गावावर शाेककळा पसरली हाेती.

उत्तर कार्यासाठी प्रशासनाने उत्तम सहकार्य केले. सर्व व्यवस्था करण्यात आली हाेती. त्यासाठी ग्रामस्थांनीही माेलाचे सहकार्य केले, अशी माहिती स्थानिक आमदार भरत गाेगावले यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. घडलेली दुर्घटना अत्यंत वाईट असून मृत्यांच्या आत्याम्याला शांती लाभाे अशी श्रध्दांजली त्यांनी वाहीली.याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चाैधरी, ठाण्याचे उपमहापाैर नरेश म्हस्के,अशाेक पांडे पंचायत समिती सभापती स्वप्ना मालुसरे, जिल्हा परिषद सदस्य मनाेज काळीजकर, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यासह ग्रामस्थ,मृतांचे नातेवाईक उपस्थित हाेते

Web Title: Taliye Landslide 84 dead in Landslide Tears in relatives eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.