तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले
By Admin | Updated: April 27, 2017 00:06 IST2017-04-27T00:06:04+5:302017-04-27T00:06:04+5:30
मुरुड तालुक्यातील नांदगाव तलाठी कार्यालयाचे तलाठी संजय शिंगे व याच विभागात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी साहेबराव साबळे

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले
नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील नांदगाव तलाठी कार्यालयाचे तलाठी संजय शिंगे व याच विभागात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी साहेबराव साबळे यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग अलिबाग कार्यालयाने रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे सर्व शासकीय कार्यालयात भीतीचे वातावरण
आहे.
अदाड या गावामधील गट नंबर ५०३ या जमिनीची खरेदी लाचलुचपत विभागात तक्र ार दाखल करणारे मुरु ड तालुका शिवसेना संघटक यशवंत पाटील यांचे भाऊजी मोहन पाटील यांनी रीतसर खरेदी केली होती. खरेदी खत झाल्यावर सात बारावर नोंद करण्यासाठी तलाठी सजा उसरोळी यांच्याकडे दिली होती. यावेळी तेथील तलाठी काळे यांनी मंडळ अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. मंडळ अधिकाऱ्यांनी तलाठी व स्वत:साठी पाच पाच हजार रु पये मागितले, त्याप्रमाणे तक्र ारदारांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली होती. ठरलेल्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारच्या दरम्यान हा सापळा रचण्यात आला. मंडळ अधिकारी साहेबराव साबळे यांनी पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. परंतु तलाठी काळे या दिवशी गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर सापळा यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे उसरोळी तलाठी अगदी थोडक्यात बचावल्या आहेत .
मजगाव येथील गट नंबर ५०८ ही जमीन मुरुड तहसीलदारांच्या आदेशाप्रमाणे ३२ म ची नोंद करावयाची होती. हरिश्चंद्र कांबळी यांची ती जमीन होती. यावेळी ही नोंद दाखल करण्यासाठी तलाठी नांदगाव संजय शिंगे यांनी सर्कल व तलाठी मिळून असे एकंदर दहा हजार रु पयांची लाच मागितली होती. त्यांनी यशवंत पाटील यांना सांगितले त्याप्रमाणे ही तक्रार सुद्धा यशवंत पाटील यांनी लाचलुचपत विभागाकडे दाखल केली होती. या प्रकरणातील पाच हजार रुपये मंडळ अधिकाऱ्यांनी अगोदरच घेतले होते परंतु याच प्रकरणातील पाच हजार रु पये स्वीकारताना तलाठी संजय शिंगे यांना त्यांच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. (वार्ताहर)