कुरुळचा सुयश अमेरीकेत झाला डाॅक्टर; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव

By निखिल म्हात्रे | Published: December 7, 2023 01:36 PM2023-12-07T13:36:37+5:302023-12-07T13:37:21+5:30

सुयशने मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरातून आभिनंदन होत आहे.

Suyyash Patil of Kurul Alibaug became a doctor in America; Congratulations from all levels | कुरुळचा सुयश अमेरीकेत झाला डाॅक्टर; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव

कुरुळचा सुयश अमेरीकेत झाला डाॅक्टर; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव

अलिबाग - कुरुळ गावातील सर्वसामान्य कुटूंबातील सुयश पाटीलने सेंन्ट जाॅन्ह युनिव्हरसिटी न्युयाॅर्क येथे टिबी या रोगावर यशस्वीपणे संशोधन पूर्ण केले. टिबी या रोगावर बनविलेले औषध सुयशने युनिव्हरसिटी कमिटीसमोर सादर केले. या औषधाला कमिटीने मान्यता देत नुकतीच सुयशला डाॅक्टरेड पदवी न्युयाॅर्क येथे बहाल करण्यात आली. सुयशने मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरातून आभिनंदन होत आहे.

क्षयरोग (टीबी) हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. हा रोग जडण्याची बहुतांश कारणे आहेत. या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी प्रभावी उपचार विकसित करण्याची आणि रुग्णांना प्रदान करण्याची तातडीने गरज आहे. सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, न्यू यॉर्क येथे सुयशच्या शोधनिबंधाच्या कामात, त्याने संसर्गापासून जास्तीत जास्त परिणामकारकतेसाठी आणि कमी खर्चात इनहेलेशन मार्गाने वितरित करण्यासाठी टीबीविरोधी औषधांची पावडर तयार केली. 

प्रबंध समितीने उपचार पद्धतीचा आढावा घेतला आणि सुयशने बनविलेल्या पावडरला मान्यता देत त्याला डॉक्टरेट प्रदान केली. या प्रकल्पाला डॉ. नितेश कुंदा यांनी मार्गदर्शन केले. सुयशच्या प्रोजेक्ट करीता औषधनिर्माण विभागाकडून निधी मिळाला. सुयशने इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी), मुंबई येथून पदवी पूर्ण केली आणि अलिबागमधील आरसीएफ आणि केईएस स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. बाहेरील देशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न सुयशच्या आई-वडीलांनी पुर्ण केले. तसेच सुयशच्या काका-काकी, आजी-आजोबा भावंडांनी त्याला पाठबल दिले.

Web Title: Suyyash Patil of Kurul Alibaug became a doctor in America; Congratulations from all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.