शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत उत्पन्न देणारी वालशेती बहरली; बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 22:54 IST

रब्बी हंगामात ५० ते ६० एकरमध्ये लागवड

- दत्ता म्हात्रे पेण : रब्बी हंगामातील शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी वाल पिकाला प्राधान्य देतात. गतवर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचा फायदा जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी झाला. खरीप हंगाम संपताक्षणी जमिनीतील ओलावा दोन ते तीन महिने टिकेल, असा तर्क बांधून यंदा रब्बी हंगामात ५० ते ६० एकर शेतीत वालपीक लागवड करण्यात आली आहे.सध्या पेण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वालाची शेती बहरल्याने शेतकरी सुखावला आहे. वालाच्या शेंगा चवीला रुचकर असल्याने प्रति किलो ५० ते ६० दराने शेंगाची विक्री होत आहे. रब्बी हंगामातील शाश्वत उत्पन्न देणारे पीक सध्या परिसरातील शेतकरी वाल पिकाच्या शेतीलाच प्राधान्य देत आहेत. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात वाल पीक ओलावा असलेल्या जमिनीत पेरले जाते. पीक संरक्षणासाठी शेतीला सभोवार काटेरी कुंपण घातले की, शेतकरी निर्धास्त होतो. त्यानंतर एकदा का बी रुजून कोंब फुटले की, अल्पावधीतच शेती बहरू लागते. त्यानंतर खतांची अल्पप्रमाणात मात्रा दिली की, जेवढे थंड हवामान तेवढा फायदा पिकाला होतो.यंदा जमिनीला ओलावा, थंड व अनुकूल हवामान मिळाल्याने पीक जोमदार आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वालाच्या शेंगा परिपक्व होऊन पीक काढणीला येईल. वेलवर्गीय प्रकारातील हे पीक शेतकऱ्यांना यंदा चांगली आर्थिककमाई करून देणार असल्याने शेतकºयांकडून समाधान व्यक्त होत आहे.उत्पादन अधिक व खर्च कमी असल्याने फायदेशीरपेण ग्रामीण भागातील करोनी, दुरशेत, जिते, आंबिवली, बळवली अशा बाळगंगा नदीखोºयातील भागात वालशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. याशिवाय पाटणोली, वाशी नाका, पाबळ खोरे व हेटवणे धरणाच्या परिसरातील शेतकरीही वेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. उत्पादन अधिक व खर्च कमी असल्याने शेतकºयांसाठी ही शेती फायदेशीर ठरत आहे. वालाच्या शेंगा व कडधान्यातील वालाला चांगला भाव मिळतो. वालाची विक्री प्रतिकिलो १३० ते १४० रुपये दराने केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी