बेमुदत उपोषणाला स्थगिती
By Admin | Updated: October 27, 2016 03:23 IST2016-10-27T03:23:06+5:302016-10-27T03:23:06+5:30
गोडसई येथील लियाकत मांडलेकर यांना तीन महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली होती. याबाबत तेव्हा नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद के ला होता.

बेमुदत उपोषणाला स्थगिती
नागोठणे : गोडसई येथील लियाकत मांडलेकर यांना तीन महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली होती. याबाबत तेव्हा नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद के ला होता. मात्र पुढील कारवाई न झाल्याने कुटुंबीयांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.
लियाकत मांडलेकर यांना करण्यात आलेल्या मारहाणीत असगर मांडलेकर आणि इस्माईल मांडलेकर यांचा हात असल्याबाबत पोलिसांना सांगितले होते. मात्र संशयितांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ २१ आॅक्टोबरला पत्रान्वये लियाकत यांच्या पत्नी अफसरी मांडलेकर यांनी कुटुंबासह २६ आॅक्टोबरपासून नागोठणे पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. मंगळवारी सायंकाळी उशिरा पोलीस अधिकारी आणि मांडलेकर कुटुंबीय यांच्यात बैठक झाली. यावेळी कारवाईचे पो. नि. बाळासाहेब दरेकर यांचे स्वाक्षरीचे पत्र अफसरी मांडलेकर यांना देण्यात आले. यामुळे मांडलेकर यांनी बेमुदत उपोषणाला स्थगिती दिल्याचे यावेळी स्पष्ट केले.