शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी पुन्हा तटकरे? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 05:10 IST

: आज पक्षाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

आविष्कार देसाई 

अलिबाग : २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक शनिवारी पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात पार पडणार आहे. रायगडलोकसभा मतदार संघातून प्रदेश सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या उमेदवारीवर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब या बैठकीत होणार आहे. शिवसेनेनेही खासदार अनंत गीते यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याने रायगडलोकसभा मतदार संघामध्ये पुन्हा दिग्गज नेत्यांची तुल्यबळ लढत रायगडकरांना अनुभवता येणार आहे.

मुंबईमधील बैठकीमध्ये प्रामुख्याने रायगड लोकसभा मतदारासंघाच्या व्यूहरचनेबाबतचा रोख राहणार आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार गीते यांनी तटकरे यांचा अवघ्या दोन हजार ११० मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे, तटकरे यांच्या पराभवाला विविध पैलू होते. त्यामध्ये प्रामुख्याने शेकापने तटकरे यांना निवडणुकीत पराभूत करायचेच, अशा सोंगट्या राजकीय पटलावर फेकल्या होत्या. शेकापने कोकणातील माजी आमदार रमेश कदम यांना तटकरे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवले होते. त्याचप्रमाणे सुनील तटकरे नामसार्धम्य असणारी व्यक्ती या निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकून उभी होती. शेकापने तटकरे यांच्या विरोधात पराकोटीचा प्रचार केला. त्यासाठी त्यांनी भाजपाचे आताचे खासदार किरीट सोमय्या, आम आदमी पार्टीचे प्रमख तथा दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सारख्यांना हाताशी घेतले होते. तटकरे यांच्या विरोधात एकवटलेली साम, दाम, दंड, भेद यांची ताकद पराभवाला कारणीभूत ठरली. हे आव्हान स्वीकारून अनंत गीते यांना निवडणुकीत त्यांनी धोबीपछाड देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. गीते हे याआधी तब्बल एक लाख मताधिक्य घेऊन निवडून येत होते. मात्र, तटकरे यांनी गीतेंचा हाच सहा आकडी विजय अवघ्या दोन हजारांवर आणून ठेवण्याची किमया केली होती.

२०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत तटकरे यांना विजय खेचून आणण्यासाठी शेकापची मदत लाखमोलाची ठरणार आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी याआधीच विविध सभांमध्ये रायगड लोकसभेतून तटकरे यांना निवडून आणण्याच्या वल्गना केल्या आहेत. शेकापने अधिकृतरीत्या भूमिका स्पष्ट केली नसली, तरी त्यांची ताकदही तटकरे यांच्याच बाजूने राहणार असल्याचे दिसून येते.लोकसभा निवडणुकीचे रणशिंगशनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया बैठकीमध्ये अधिकृतरीत्या तटकरे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार आहे, त्यामुळे मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची आयती संधी तटकरे यांना पक्षाकडून मिळणार असल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी कमालीचे खूश झाले आहेत.दरम्यान, रायगड लोकसभेतून तटकरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यास खºया अर्थाने पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग रायगडमधून फुंकल्याचे अधोरेखित होते.

टॅग्स :RaigadरायगडNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभा