शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा 'पार्थ'साठी मातोश्री सुनेत्रा पवार प्रचाराच्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 12:33 IST

मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या.

पनवेल : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. 

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वडील अजित पवार यांच्यासह मातोश्री सुनेत्रा पवार सुद्धा मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

दरम्यान, पार्थ पवार यांना आधीच सोशल मीडियात विविध कारणावरुन ट्रोल करण्यात येत आहे. यातच पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. दापोडीतील विनियार्ड चचेर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांची गेल्या शनिवारी पार्थ पवार यांनी भेट घेतली. यामुळे त्यांना पुन्हा पार्थ ट्रोल करण्यात आले. 

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मात्र, यात पनवेल, उरणमधील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पनवेल विधानसभेवर भाजपा तर उरण विधानसभेवर सेनेचा आमदार असल्याने आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून बारणे यांनी पनवेल, उरण मतदार संघात जनसपंर्क ठेवल्याने येथील मतदारांना बारणे नवखे नाहीत. मात्र, थेट लोकसभेची उमेदवारी प्राप्त झाल्यानंतर राजकारणात उडी घेतलेले पार्थ पवार हे मतदारांना नवखे आहेत.

२२ लाख लोकसंख्यामावळ लोकसभा मतदार संघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदार संघ आहे. राज्यात ठाणे लोकसभा मतदार संघ सर्वात मोठा आहे. या मतदार संघाची संख्या 23 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यापाठोपाठ मावळ लोकसभा मतदार संघ राज्यातील दुसरा सर्वात मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघात मतदारांची संख्या 22 लाखांपेक्षा जास्त आहे. 

टॅग्स :maval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpanvelपनवेलAjit Pawarअजित पवार