सुलभा पवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

By Admin | Updated: November 15, 2016 04:51 IST2016-11-15T04:51:04+5:302016-11-15T04:51:04+5:30

खवली ग्रामपंचायतीच्या सदस्या सुलभा पवार यांनी घरकूल घोटाळा केल्यामुळे विभागीय आयुक्त कोकण विभाग प्रभाकर देशमुख यांनी त्यांचे सदस्यत्व

Sulabh Pawar's gram panchayat cancels membership | सुलभा पवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

सुलभा पवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

पाली : खवली ग्रामपंचायतीच्या सदस्या सुलभा पवार यांनी घरकूल घोटाळा केल्यामुळे विभागीय आयुक्त कोकण विभाग प्रभाकर देशमुख यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीच्या सदस्या सुलभा पवार यांनी २००३ मध्ये घरकूल योजनेचा लाभ घेतला होता. यानंतर त्या २०१४-१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर अनु. जमातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदावर रु जू झाल्याने त्यांनी पदाचा गैरवापर करत त्यांच्या पतीच्या नावे दुबार घरकूल मंजूर केले. ही घटना नियमबाह्य घरकूल घोटाळ्याची असल्याची तक्रार खवली येथील ग्रामस्थ राजेश बेलोसे यांनी सुधागड गटविकास अधिकारी यांच्याकडे के ली होती.त्या अनुषंगाने ग्रामपंचायत अधिनियमांच्या तरतुदीनुसार चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.रायगड यांनी अहवाल सादर करावे, असे आवाहन केले होते व निर्णय सुनावण्यापूर्वी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता २० सप्टेंबर २०१६ रोजी सुनावणी घेण्यात आली. यावेळी तक्रारदार राजेश बेलोसे तसेच जि.प.रायगडचे प्रतिनिधी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. मात्र प्रतिवादी असलेल्या तत्कालीन सरपंच सुलभा पवार या अनुपस्थित होत्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इंदिरा आवास योजनेअंतर्गत २००२-२००३ मध्ये घरकूल योजनेचा लाभ देण्यात आल्याची नोंद असेसमेंट रजिस्टरवर आहे. २००३ मध्ये बांधलेले घरकूल सुलभा पवार वापरत व २०१४-१५ मध्ये नव्याने बांधण्यात आलेले घरकूल गणपत पवार वापरतात. रेशनकार्डवर दोघांचीही नावे असल्याने पती व पत्नीच्या नावे दुबार घरकूल घेतल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल सादर केला. (वार्ताहर)

Web Title: Sulabh Pawar's gram panchayat cancels membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.