शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

नामशेष भाताच्या कोठारात गव्हाचे उत्पादन शक्य, शशिकांत थळे यांचा यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 1:39 AM

कोकणातील खाऱ्या हवामानाच्या प्रदेशात गव्हाच्या अत्यंत पौष्टिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बन्सी’ या प्रजातीच्या गव्हाचे उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकते

जयंत धुळप 

अलिबाग : भात उत्पादनात अग्रेसर असल्याने एके काळी रायगड जिल्ह्यास भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे; परंतु अनेक कारणास्तव जिल्ह्याचा हा नावलौकिक संपुष्टात आला असतानाच, कोकणातील खाऱ्या हवामानाच्या प्रदेशात गव्हाच्या अत्यंत पौष्टिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बन्सी’ या प्रजातीच्या गव्हाचे उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकते हे अलिबाग तालुक्यांतील पळी-चरी येथील शेतकरी शशिकांत थळे यांनी प्रत्यक्ष उत्पादन घेऊन सिद्ध करून दाखविले आहे.

गव्हाचे शरबती, बन्सी व खपली अशा तीन मुख्य प्रजाती आहेत. त्यांची शास्त्रीय नावे वेगवेगळी आहेत. यातील शरबती गव्हाची लागवड व उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मात्र, अधिक पौष्टिक असणाऱ्या बन्सी व खपली गव्हाची लागवड कमी प्रमाणात होते. बन्सी गव्हामध्ये प्रथिने व बीटा कॅरोटीन या पौष्टिक तत्त्वांचे प्रमाण अधिक आहे, तसेच त्यांच्यात जास्त लवचिक ग्लूटेन आहेत. परदेशात बन्सी गव्हाला मोठी मागणी आहे.

पद्मश्री सुभाष पाळेकर हेदेखील बन्सी गव्हाची लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करत असतात. गव्हाच्या पिकाला अधिक थंडीची गरज असते, त्यामुळे देशावर गव्हाची लागवड अधिक प्रमाणात होते. कोकण हा भाग समुद्रकिनारी असल्याने खारे वारे व मतलबी वारे यामुळे थंडीचे कमी प्रमाण असे प्रतिकूल वातावरण येथे असते. शशिकांत थळे यांनी यावर्षी हिवाळ्यात बन्सी गव्हाची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत चांगले पीक त्यांनी घेतले आहे.

मूळ चरी येथील आणि शासनाच्या सेवेत समाजकल्याण उपायुक्त म्हणून कार्यरत प्रमोद जाधव यांनी बन्सी गव्हाचे बियाणे परभणी येथून थळे यांना उपलब्ध करून दिले. गव्हाचा दाणा कणसातून बाहेर काढण्यासाठी लागणारे ‘मोगरी’ हे लाकडी साधन आवश्यक असते, ते जाधव यांनी अहमदनगर येथून उपलब्ध करून दिले. मोगरी हे साधन स्थानिक सुताराकडून देखील तयार करून घेता येऊ शकते.

यंदाच्या पिकातील कणसे जतन करून पुढील वर्षाच्या बियाण्यांकरिता वापरणारथळे यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बन्सी गव्हाची लागवड केली. लागवडीनंतर दहा-दहा दिवसांनी गरजेनुसार पिकाला पाणी दिले. त्यांच्या आईने त्यांना या कामात साथ दिली. थळे हे या कणसातील टपोरी कणसे बाजूला काढून पुढील वर्षी बियाण्यांकरिता वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. थळे हे भाताबरोबरच तोंडली, कारली, दुधी, वाल, मूग, चवळी, हरभरा, वांगी, मुळा अशा विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून उत्पादन घेत असतात.पळी-चरी येथील शेतकरी शशिकांत थळे यांनी खाऱ्या हवामानात गहू पिकवला असून त्यांची ही प्रयोगशीलता कोकणातील विशेषत: खारेपाटातील शेतकऱ्यांना निश्चितच पथदर्शी ठरू शकणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी