शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जखमी घुबडाची महाडमध्ये यशस्वी गगनभरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:57 IST

निसर्ग व पक्षी संरक्षण क्षेत्रात सक्रिय कार्यरत महाड येथील ‘सीस्केप’ संस्था आणि वनखात्याच्या संयुक्त प्रयत्नातून एका जखमी घुबडाने आठ दिवसांच्या औषधोपचारांती मंगळवारी यशस्वीरीत्या मुक्त भरारी घेतली.

अलिबाग : निसर्ग व पक्षी संरक्षण क्षेत्रात सक्रिय कार्यरत महाड येथील ‘सीस्केप’ संस्था आणि वनखात्याच्या संयुक्त प्रयत्नातून एका जखमी घुबडाने आठ दिवसांच्या औषधोपचारांती मंगळवारी यशस्वीरीत्या मुक्त भरारी घेतली. याबाबतची माहिती सीस्केपचे अध्यक्ष तथा पर्यावरणतज्ज्ञ पे्रमसागर मेस्त्री यांनी दिली आहे.महाडमधील श्री विरेश्वर ग्रामदैवत संस्थानच्या छबिना उत्सवाची जय्यत सुरू असताना, एक घुबड विरेश्वर तळ्याकाठी असलेल्या वेरणेकर यांच्या घराशेजारील इलेक्ट्रिक वायरवर लटकताना दिसून आले. त्यांनी तत्काळ सीस्केप सदस्य राजेंद्र सपकाळ आणि रूपेश वनारसे यांना कळविले. घटनास्थळी पोहोचताच ते घुबड पतंगाच्या मांजामध्ये गंभीररीत्या अडकल्याचे लक्षात आले. मंगेश जोशी आणि प्रेमसागर मेस्त्री यांनी त्याच्या सहकार्यांच्या मदतीने या घुबडाला सोडवले. पतंगाच्या मांजामुळे त्याच्या पायातील बोटांमध्ये जखम झाली होती. तर उजवा पंख मांजाच्या धारदार दोऱ्याने जखमी झाला होता. त्यावर तातडीने उपचार करण्यात आले व सीस्केपच्या कार्यालयात त्यास देखभालीकरिता ठेवण्यात आले. उपचारांती घुबडाला चवदार तळ्याच्या प्रांगणात सोडल्यावर त्याने उंच भरारी घेतली. वनखात्याचे जाधव आणि सीस्केपचे सदस्य उपस्थित होते.महाड वनपरिक्षेत्र कार्यालयाचे एस .बी. जाधव यांनी नोंदणी आणि इतर बाबी पूर्ण करण्याचे काम पाहिले. कोणत्याही जखमी वन्यजीवास वाचविण्यासाठी त्याला उपचारासाठी जर कुणाच्या घरी किंवा वनविभागाकडे सुपूर्द केले असेल, तर त्याची वन्यजीव कायद्यानुसार नोंद करणे अत्यावश्यक असते.घुबड शेतकऱ्याचा मित्रएका घुबडाचे कुटुंब म्हणजे नर-मादी आणि त्यांची कमीत कमी चार पिल्ले. ते एका रात्रीत सहा ते आठ उंदीर फस्त करतात. घुबडाच्या विणीचा-पिल्ले मोठे करण्याचा कालावधी तीन ते चार महिने असतो. या एकूण १२० दिवसांत ते १८०० ते २००० उंदीर फस्त करतात.गव्हाणी घुबडाच्या एका कुटुंबाचा असाच सीस्केपने शास्त्रीय अभ्यास केला. त्या वेळी एका कुटुंबाने २१६० उंदीर मारल्याने निष्पन झाले, यामुळे घुबड हा शेतकºयास उंदीर संख्येवर नियंत्रण ठेवण्यास खूपच महत्त्वाचा पक्षी सिद्ध झाला आहे. घुबडाच्या सर्व प्रजातींचे संरक्षण होणे ही काळाची गरज आहे. खरतर घुबड हे लक्ष्मी देवतेचे वाहन आहे. तेव्हा अपशकून म्हणून त्याची बदनामी करण्यापेक्षा लक्ष्मीचे वाहन म्हणून त्याचे स्वागत होणे गरजेचे असल्याची माहिती मेस्त्री यांनी यानिमित्ताने दिली.