शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?
2
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
3
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
4
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
5
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
6
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
7
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
8
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
9
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर
10
'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा
11
चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 
12
वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले, पण का?
13
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
14
मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'
15
जी-७ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी इटलीला रवाना, जॉर्जिओ मेलोनी यांची घेणार भेट!
16
फिल्म सिटीबाहेर कचऱ्याचा ढीग! शशांक केतकर संतापला, म्हणाला- "गेल्या १० वर्षात ही जागा कधीच स्वच्छ..."
17
WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर; यजमानांचा झंझावात
18
वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉ. संजीव ठाकूर पुन्हा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होणार!
19
‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता
20
'आमचा विरोध नाही, पण...'! UCC संदर्भात JDU नेत्याचं विधान, भाजपचं टेन्शन वाढणार

रायगड किल्ल्याविषयी वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसात हजर करा; जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आदेश

By जमीर काझी | Published: October 20, 2022 5:24 PM

रायगड किल्ल्यावरील दुरवस्थेबाबत 'लोकमत' ने सोमवारी 'शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्वची बेफिकिरी” या शिर्षकानव्ये  वृत्त दिले होते.

अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील अनास्थेबाबत जिल्हा प्रशासनाला आता तत्पर झाले आहे गडावरील समाधी स्थित परिस्थिती व परिसरातील गैरसुविधा बाबत ७ दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रायगड किल्ल्यावरील दुरवस्थेबाबत 'लोकमत' ने सोमवारी 'शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्वची बेफिकिरी” या शिर्षकानव्ये  वृत्त दिले होते. गडावरील दुरावस्था, महाराजांच्या कथित श्वानाच्या चौथ्याऱ्याच्या रक्षणासाठी सुरक्षारक्षकांकडून ऐतिहासिक ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला असल्याचे मांडले होते. त्याबाबत संशोधक व शिवप्रेमीच्यात संताप व्यक्त होत असल्याने 

भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नमूद केली होती. त्यामुळे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याच दिवशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या त्यानंतर आज जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी  यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, उपविभाग महाडचे संरक्षण सहाय्यक यांना याबाबत आवश्यक पडताळणी व चौकशी करून, पुढील नियमोचित कार्यवाही तात्काळ करावी, तसेच बातमीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याविषयी सूचना केल्या आहेत.

टॅग्स :alibaugअलिबाग