बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:18 AM2018-05-23T00:18:03+5:302018-05-23T00:18:03+5:30

यांत्रिक मासेमारी नौकांस अपघात झाल्यास, अशा नौकांस सरकारकडून नुकसानभरपाई मिळणार नाही.

Strict action against fishermen during the ban | बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई’

बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई’

Next

अलिबाग : पावसाळ्यात मासेमारी बंद कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास किंवा केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार बोटी आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे. बंदी कालावधीत ज्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांचे विविध लाभांसाठीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. यांत्रिक मासेमारी नौकांस अपघात झाल्यास, अशा नौकांस सरकारकडून नुकसानभरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांनी बेकायदेशीर मासेमारी करू नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे प्र. सहायक आयुक्त दि. हं. पाटील यांनी केले आहे. अधिनियमानुसार, समुद्रामध्ये १ जून ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत मासेमारी करण्याला बंदी केली आहे.

Web Title: Strict action against fishermen during the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.