शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

रायगडमध्ये सात तालुक्यांना वादळाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 11:22 PM

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यातील समुद्र, खाडीकिनाऱ्यालगतच्या गावांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. ताशी १०० ते १२० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे वादळाची तीव्रता भयंकर रूप धारण करण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगडमधील सात तालुक्यांना या वादळाचा फटका बसण्याची शक्यता असून समुद्र आणि खाडी किनाºयालगतच्या गावांमधील नागरिकांना मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. निसर्ग असे या आपत्तीला नाव देण्यात आले आहे. सुरुवातीला श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या दिशेने हे वादळ सरकत असतानाच अचानक ते अलिबागला धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ४ जूनपर्यंत महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व रोहा या सात तालुक्यांतील किनाºयालगतच्या गावांमधील नागरिकांना मंगळवारी २ जून रात्री १२ वाजल्यापासून ३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास तसेच पाळीव प्राण्यांना मोकळ्या जागेत सोडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५ हजार ६६८ मच्छीमारांना परत बोलावून घेण्यात आले आहे. वादळी परिस्थिती लक्षात घेऊन वीजपुरवठा बंद करण्याची शक्यता आहे अशी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.वादळाचा अलिबागला फटकाबसण्याची शक्यता कमी - राजाराम भगतआतापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध आपत्तीचा तडाखा जिल्ह्यातील अन्य भागांना बसला आहे. मात्र अद्यापही चक्रीवादळाचा अथवा त्सुनामीचाही धक्का अलिबागला लागला नव्हता. येथील वयोवृध्द कोळी समाजातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अलिबागही रामभूमी (रामखंड) आहे. श्रीराम जेंव्हा सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी लंकेला निघाले होते. तेंव्हा काही कालावधीसाठी त्यांनी अलिबाग कुरुळ (उंडिचाभाट) येथे विश्रांती घेतली होती. अलिबागच्या समुद्र किनारपट्टीचा आकार हा रामाच्या धुनष्याप्रमाणे आहे.त्यामुळे चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला नाही, असे राजाराम भगत यांनी लोकमतला सांगितले. त्याचप्रमाणे सूर्यादयाच्या वेळी पश्चिमेला किंवा सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेला आकाशामध्ये अर्ध्या आकाराचे इंद्रधनुष्य दिसते. ते अद्याप दिसलेले नाही. त्यामुळे वादळाचा धोका पोचण्याची शक्यता कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. समुद्र किनाºयातील वाळूमधील खेकड्यांनी वाळूमध्ये खोलवर होल करुन घरे केली आणि त्या होलमधून पाण्याचे मोठे फुगे तयार झाल्यास वादळाची तिव्रता अधिक असते असेही त्यांनी सांगितले.पहिल्याच पावसात वीज वितरण कोलमडलेकळंबोली : जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पनवेल परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. मंगळवारी पाच वाजता वाºयासह पावसाला सुरुवात झाली. वाºयामुळे पनवेल परिसरात दोन तास बत्ती गुल झाल्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागला. अवघ्या काही मिनिटाच्या पावसात बत्ती गुल झाल्याने महावितरणचे आपत्ती व्यवस्थापन फोल ठरल्याने दिसून आले आहे.गेल्या काही दिवसापासून तापमाणाचा पारा वाढत असतानाच सोमवारपासून पनवेल परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरवर्षी ७ जूनला पावसाचे आगमन होते. मात्र यंदा जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावली. मंगळवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. यात पनवेल परिसरासह खांदा वसाहत, विचूंबे परिसरातील बत्ती गुल झाली.यामुळे लॉकडाउनमध्ये वर्क फॉम होम करणाऱ्यांची पंचाईत झाली. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोबाईल , लॅपटॉप बंद पडून कामात खोळंबा झाला. वास्तविक, पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे, वेळोवेळी शटडाऊन घेण्यात आले आहे. मात्र पहिल्याच पावसात बत्ती गुल झाल्याने महावितरणचे आपत्ती व्यवस्थापन फोल ठरले आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ