शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खाडीपट्ट्यातील प्रदूषणाचा मुद्दा पेटला , म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर दोन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:28 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधून घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वारंवार ओव्हरफ्लो होत आहे. महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नेहमी होणा-या घातक रसायन सांडपाण्याच्या गळतीवर वारंवार तक्रार होवून देखील औद्योगिक वसाहत

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वारंवार ओव्हरफ्लो होत आहे. महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नेहमी होणा-या घातक रसायन सांडपाण्याच्या गळतीवर वारंवार तक्रार होवून देखील औद्योगिक वसाहत अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. बुधवारी या विभागात गोळे गाव हद्दीत व रावढळ गाव हद्दीत अचानक ही पाइपलाइन लिकेज होवून मोठ्या प्रमाणात घातक रासायनिक सांडपाणी वाहू लागले. अनेक नागरिकांनी याची तक्रार करून देखील कोणी अधिकारी याकडे फिरकला नसल्याने या विभागात सकाळपासूनच वातावरण तापले. दुपारी ५ तासांनंतर या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पोहोचल्यानंतर नागरिकांनी त्यांना घेराव घातला. याची माहिती माजी आ. माणिक जगताप यांना मिळाल्याने तेही त्या ठिकाणी पोहोचले व नागरिकांसोबत दोन तास रस्त्यावर बसून रास्ता रोको करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली.जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत रास्ता रोको थांबणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठांकडून फोनवरून कारवाईचे आश्वासनानंतर रास्ता रोको थांबविण्यात आला.गेली ३० वर्षे महाड औद्योगिक वसाहत ही महाडकर नागरिकांना डोकेदुखी बनली आहे. संपूर्ण महाड तालुका या औद्योगिक क्षेत्रामुळे प्रदूषित झाला आहे. या औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणारा सावित्री खाडीला घातक रसायनयुक्त पाणी याची नेहमी पाइपलाइन ओव्हर फ्लो होऊन फुटत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेती नापीक झाली असून वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील रावढळ या गाव हद्दीत हीच घातक रसायनयुक्त सांडपाण्याच्या पाइपलाइनला गळती लागली, तसेच दुसºया पाइपलाइनला गोठे गाव हद्दीत गळती लागली. रावढळ गाव हद्दीत गळती होणाºया पाइपलाइनचे घातक रसायनयुक्त सांडपाणी थेट नागेश्वरी नदीत मिसळू लागले. या नदीवर एक छोटासा बंधारा असून वरच्या बाजूस बामणे, सापे, अप्पर तुडील, भेलोशी, नरवन, आद्रे, खुटील या गावांच्या पिण्याच्या पाण्याची जॅकवेल आहे. सकाळी ९ वा. लिकेज झालेली पाइपलाइनची तक्रार देवून महाड औद्योगिक वसाहत क्षेत्रामधून एकही अधिकारी याकडे फिरकला नसल्याने दुपारी या विभागातील नागरिकांचा संताप वाढला व शेकडो नागरिक विरोधात रस्त्यावर उतरले. याची माहिती माजी आ. माणिक जगताप यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जावून पाच तासांनंतर त्या ठिकाणी पोहोचलेल्या प्रदूषण मंडळाचे अधिकारी माने तसेच महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक यांना विचारणा करता अद्याप कारवाई काय झाली याची माहिती घेत नागरिकांसोबत रस्त्यावर ठाण मांडून तब्बल दोन तास रास्ता रोको करत संबंधित अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या रास्ता रोकोमध्ये खाडीपट्टा विभागातील शेकडोंनी भाग घेतला होता.स्थानिकांना नोकºया नाहीतया रास्ता रोकोदरम्यान माणिक जगताप यांनी कारखानदारांवर आरोप करत स्थानिक लोकांना नोकºया दिल्या जात नाही. सध्या ८० टक्के परप्रांतीय कारखानदारांमध्ये काम करत असून २० टक्के फक्त स्थानिक कामगार काम करत आहेत. कारखानदार काहीना काही कारण दाखवत स्थानिक कामगारांना नोकºया देत नसल्याचा आरोप यावेळी केला. मात्र यापुढे ही बाब सहन केली जाणार नाही. या विरोधात आंदोलनाचा इशाराही दिला.वसुंधरा अ‍ॅवॉर्डवर आक्षेपकाही महिन्यापूर्वीच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला वसुंधरा अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. यावर माणिक जगताप यांनी आक्षेप घेत प्रदूषणमुक्त झाला आहे. मग खाडीपट्ट्यात होणारे प्रदूषण कुठले.महाड औद्योगिक वसाहतीतील प्रिव्ही आॅर्गनिक्स हा कारखाना मोठा प्रदूषणकारी असून त्याचा मॅनेजरच सामाईक सांडपाणी केंद्राचा अध्यक्ष आहे. त्यामुळे या सर्व प्रदूषणाला कारणीभूतच हा कारखाना आहे. चोर पण हेच, चोºया करणारे पण हेच अशी टीका जगताप यांनी करत वसुंधरा अ‍ॅवॉर्ड मिळाला कसा यावर संशय व्यक्त केला.सध्या या विभागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून प्रत्येक गावात १० पेशंट कॅन्सरचे असून टीबी, दमा इतर आजाराने हा विभाग ग्रासला असून या प्रदूषणामुळेच हे आजार उद्भवले असल्याचा आरोप माजी आ. माणिक जगताप यांनी यावेळी केला.