वडखळ नाक्यावर रास्ता रोको

By Admin | Updated: September 8, 2015 23:39 IST2015-09-08T23:39:09+5:302015-09-08T23:39:09+5:30

गणेशोत्सव येऊन ठेपला तरी राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे अद्याप बुजविले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून

Stop the road at the pedestal | वडखळ नाक्यावर रास्ता रोको

वडखळ नाक्यावर रास्ता रोको

कर्जत : गणेशोत्सव येऊन ठेपला तरी राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे अद्याप बुजविले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून नियोजनशून्य, नाकर्त्या राज्य सरकारला इशारा देण्यासाठी ११ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता वडखळ नाक्यावर रायगड व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन शांततेत होणार असून प्रवाशांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कर्जतमधील रॉयल गार्डनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. विविध विषयांवर बोलताना सुनील तटकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. कोकणातला महत्त्वपूर्ण सण असलेल्या गणेशोत्सवासाठी यंदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनही सरकारने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही त्याबद्दल निषेध व्यक्त करतो, असे सांगितले. रास्ता रोको आंदोलन हा केवळ इशारा आहे. प्रसंगी वेळोवेळी हल्लाबोल करू असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Stop the road at the pedestal