चोरीला गेलेली तोफ सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 04:10 IST2018-07-13T04:10:09+5:302018-07-13T04:10:17+5:30

पद्मदुर्ग (कासा) किल्ल्यावरील पोलादी तोफ २०१५ रोजी चोरीला गेल्याची तक्र ार पुरातत्त्व खात्याने मुरु ड पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

 The stolen thief was found | चोरीला गेलेली तोफ सापडली

चोरीला गेलेली तोफ सापडली

आगरदांडा : पद्मदुर्ग (कासा) किल्ल्यावरील पोलादी तोफ २०१५ रोजी चोरीला गेल्याची तक्र ार पुरातत्त्व खात्याने मुरु ड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार मुरु ड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल होता; परंतु ही पोलादी तोफ मुरु ड जवळील एकदरा पुलाखाली आढळून आली आहे. मुरु ड पोलीस ठाण्याने तोफ ताब्यात घेतली असून पुरातत्त्व खात्याला कळविण्यात आले आहे.
एकदरा पुलाखाली नुकतेच खाडी उत्खनाचे काम करण्यात आले. या खाडीतील गाळ उपसण्यात आला आहे. भरतीमुळे वाळू वाहून गेल्याने गाळात रुतलेली तोफ दिसली. याबाबत कोळी बांधवांनी मुरुड पोलीस ठाण्याला कळविले. न्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी तोफ ताब्यात घेतली. तोफ सापडल्याबाबत पुरातत्त्व विभागाला कळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  The stolen thief was found

टॅग्स :Raigadरायगड