कोकण रेल्वेत चोरी
By Admin | Updated: November 15, 2016 04:45 IST2016-11-15T04:44:40+5:302016-11-15T04:45:38+5:30
कोकण रेल्वेतून प्रवास करीत असलेल्या महिलेच्या बॅगमधून एक लाख सोळा हजार रुपये किमतीच्या जुन्या दागिन्यांचा डबा चोरट्याने पळवल्याची

कोकण रेल्वेत चोरी
माणगाव : कोकण रेल्वेतून प्रवास करीत असलेल्या महिलेच्या बॅगमधून एक लाख सोळा हजार रुपये किमतीच्या जुन्या दागिन्यांचा डबा चोरट्याने पळवल्याची घटना नुकतीच दिवा ते गोरेगाव प्रवासादरम्यान घडली आहे.
रेश्मा राजेश कासार (४२,सध्या रा. पाळ रोड, ठाणे) मूळ रा.चिंचवली वाडी, गोरेगांव ही महिला शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी ठाणे येथून लोकल ट्रेनने दिवापर्यंत गेली. नंतर दिवा - सावंतवाडी या कोकण रेल्वेने गोरेगांव येथे येण्यासाठी प्रवास करीत होती. दरम्यानच्या प्रवासात चोरट्याने त्यांच्या बॅगमधून सोन्याचे दागिने असलेला डबा पळवला. प्रवास करून घरी पोहचल्यानंतर काही तासांनी आपल्या बॅगेची तपासणी केली असता रेश्मा यांना दागिन्यांचा डबा मिळून आला नाही. त्यांनी आपल्या नातेवाइकांकडे चौकशी के ली परंतु डबा सापडला नाही. अखेर गोरेगांव पोलीस ठाण्यात धाव घेऊन रेश्मा यांनी फिर्याद दाखल केली.
डब्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे जुने गंठन, सोन्याची दोन कर्णफुले ,पट्ट्या व पान असलेले ४ तोळे वजनाचे एक जुने सोन्याचे गंठन, ४ ग्रॅम सोन्याच्या कानपट्टी कुड्या, कानातील साखळ्या ६ ग्रॅम किंमत १२ हजार रूपये व २ हजार रू. रोखीच्या ५०० च्या चार नोटा असा एकू ण एक लाख सोळा हजार रूपयांचा ऐवज चोरट्याने डब्यासह पळवल्याचे सांगितले. याप्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)