शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

रस्त्यावरील मातीत अडकली एसटी; प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:42 IST

बोरज फाटा ते देवळे मार्गाची दुरवस्था

पोलादपूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील राहिवाशांना व शालेय विद्यार्थ्यांचे प्रवास फेरीचे साधन असलेल्या एसटी बस सेवा नादुरुस्त रस्ते व मातीच्या गिलावात फसत असल्याने कोलमडत आहेत. शुक्रवारी सकाळी बोरज फाटा ते देवळे या मार्गावर जाणाऱ्या व येणाºया बस मातीत अडकल्या होत्या, त्यातच खड्डे बुजविण्यात येणारी माती पावसाच्या पाण्याने चिखलयुक्त होत असल्याने रस्ते निसरडे बनले आहेत.

तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थी एसटी महामंडळाच्या गाड्यांच्या फेऱ्यांवर अवलंबून आहेत. मात्र, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक बेजार झाले असून, रस्त्याची परिस्थिती पावसाळ्यापूर्वी गांभीर्याने विचारात न घेतल्याने एसटी महामंडळावर दोन गाड्यांच्या फेºया रद्द करण्याची वेळ आली.

मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची डागडुजी आणि साइडपट्ट्यांची साफसफाई तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी पोलादपूर स्थानकातून सुटणाºया लहुलसे व दाभिळ बस सेवा बोरज फाटा ते देवळे मार्गावर मातीमध्ये परतीच्या मार्गावर असताना खचल्या, यामधील प्रवासी उतरल्यानंतर बस बाहेर आली. सकाळी पोलादपूर शहर, ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी शाळेला तसेच कामधंद्यासाठी येत असतात.दाभिळ बसमध्ये ४५ च्या आसपास प्रवासी तर लहुलसे गाडीत ४० च्या आसपास प्रवासी होते. सर्व प्रवासी उतरल्यानंतर बस मागे-पुढे करत मातीमधून बाहेर पडली. या मार्गावर उन्हाळात काम करण्यात आले. मात्र, योग्य पद्धतीने काम न केल्याने या मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडले. येथील खड्डे हे मातीच्या साहाय्याने बुजवले जात असल्यामुळे बस खचत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

पोलादपूर तालुक्यातील आडाची वाडी ते मोरेवाडी, धामणदिवी ते कातळीरोड, चांदके ते खोपड, कुंभळवणे ते सानेवाडी, पितळवाडी ते केवनाळे, गोवेले ते खांडज, बोरघर ते कामथे, साखर ते गोवले आणि देवळे ते करंजे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे कुंभळवणे ते सानेवाडीपर्यंतच्या गाडीची फेरीही अर्ध्यावर आली आहे. यामुळे नजीकच्या काळात रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची तातडीने डागडुजी न केल्यास गणेशोत्सवासाठी येणाºया चाकरमान्यांची वाहने खड्ड्यात, मातीत खचून स्वागत होणार आहे.