ST hits motorcycle; One killed, 11 injured | एसटीची मोटारसायकलला धडक; एक ठार, ११ जखमी

एसटीची मोटारसायकलला धडक; एक ठार, ११ जखमी


लोकमत न्यूज नेटवर्क
वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील नवेगाव गावाजवळ एसटीने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एसटीमधील ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरून एसटी बस पाली येथून पेणकडे येत असताना पेण तालुक्यातील नवेगाव गावाजवळ आली असता बसने वडखळकडून गडबकडे जाणाऱ्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. 
या अपघातात मोटारसायकलस्वार कांचन लहू म्हात्रे (४२, रा. गडब, ता. पेण) जागीच ठार झाले तर एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने एसटीमधील ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले. 
जखमींना उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणी एसटी चालकाला वडखळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
 

Web Title: ST hits motorcycle; One killed, 11 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.