शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

फुकट्या प्रवाशांकडून एसटीची वर्षभरात २६ हजारांची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:49 AM

ही कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यात १२ टीसींची नेमणूक केली आहे.

वडखळ :  वाट पाहीन पण एसटीनेच जाईन हे ब्रीदवाक्य जरी प्रचलित असले तरी हे ब्रीदवाक्य प्रवास करताना पाळले जाते; मात्र प्रवास करताना तिकीट न काढणारे प्रवासी देखील काही कमी नाहीत. या वर्षभरात रायगडएसटी महामंडळाने जवळपास २६ हजार ८४० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यात १२ टीसींची नेमणूक केली आहे.

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी दिलेल्या विविध प्रकारच्या सुविधा आणि योजनांच्या लाभामुळे  राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा एसटी फुल्ल होऊन अनेक प्रवासी बसमध्ये उभे राहून देखील प्रवास करताना दिसत आहेत. अनेक प्रवासी विनातिकीट म्हणजेच फुकटचा प्रवास करतात. 

फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी रायगड एसटी मंडळाने १२ टीसींची नेमणूक केली असून त्यांनी वर्षभरात कारवाई केली आहे. १४७ फुकटचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या तिकीट तपासणी मार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून ७,७६० तिकिटाची रक्कम तर १९,०८० ही तिकिटावरील दंडात्मक अशी एकूण २६, ८४० रुपयांची वसुली केली आहे. 

एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षित आणि कमी किमतीत प्रवास सेवा देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे, तरी देखील अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहेत की खेदजनक बाब आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता कमी झाली असली तरी हा प्रकार पूर्णपणे बंद करून प्रवाशांनी तिकीट काढूनच एसटीने प्रवास करावा आणि एसटी महामंडळाला सहकार्य करावे.-दीपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड

टॅग्स :state transportएसटीRaigadरायगड