श्रीवर्धनमध्ये शेतीनुकसानाची दुग्ध व्यवसायाला झळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 02:40 AM2019-11-29T02:40:17+5:302019-11-29T02:41:15+5:30

: श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम गाव, वाड्या परिसरातील यंदा अवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

In Srivardhan, the dairy farming business is affected | श्रीवर्धनमध्ये शेतीनुकसानाची दुग्ध व्यवसायाला झळ

श्रीवर्धनमध्ये शेतीनुकसानाची दुग्ध व्यवसायाला झळ

Next

- गणेश प्रभाळे

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम गाव, वाड्या परिसरातील यंदा अवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरवर्षी अनेक पिकातून जनावरांना उर्वरित चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे परंपरेनुसार शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायच केला जात असे त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आर्थिक प्रश्नही सुटत होते. मात्र, यावेळी जनावरांना चारा मुबलक मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांना व्यवसायापुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच माळरानावरील गवत पेटवून दिल्याने चाºयाचा तूटवडा निर्माण झाला आहे.

तालुक्यात मागील काळात चाºयाचा प्रश्न उद्भवत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती या मुख्य व्यवसायासोबतच दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले. याच कालावधीत दुधाला योग्य दर मिळाल्याने जोड व्यवसायावर परिसरातील शेतकरी सधन झाले. अल्पावधीतच हा व्यवसाय भरभराटीस येऊन अनेक शेतकºयांनी प्रगती साधली व दुग्ध व्यवसायाकडे कल दाखविला. आज चित्र पालटले असून, दुधाचे भाव निम्म्यावर, तर पशुखाद्याचे भाव दुपटीने वाढल्याने दुग्धव्यवसायाकडे शेतकºयांनी पाठ फिरवल्याने हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे. जनावरांच्या चाºयावर होणारा खर्च व दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे समसमान असल्याने शेतकºयांच्या पदरात काहीच पडत नाही. जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वृद्धीसाठी प्रयत्न झाल्याचे दुर्मिळच मात्र धवलक्रांतीचे स्वप्न आजही नजरेच्या टप्प्यात नाही.

एकीकडे यावेळी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीतून अखेरीस जनावरांना मिळणारा पेंढा हा चारा मिळाला नाही. याशिवाय माळरानावरील गवत वानवा लावून पेटून देण्यात येत असल्याने उन्हाळी चाºयाचा प्रश्न निर्माण होत आहे. हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाºयावर जनावरांची भूक भागवावी लागत आहे. याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत असल्याने दुग्धोत्पादनात घट झाली आहे. अशा व्यवसायापुढे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने शेतकºयांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे.

तोट्याची कारणे
शासनाची उदासीनता, महत्त्वाच्या योजना बंद, अत्याधुनिक सामग्री व तंत्रज्ञाचा अभाव हे आहेत. ठोस उपयायोजना, तसेच धोरणात्मक बदल अपेक्षित, आवश्यक यंत्रसामग्री व सुविधा निर्माण करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच नवीन योजना सुरू करणे सहकारी संस्थांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.

अतिवृष्टीमुळे यावेळी शेतकºयांचे मोठे नुकसान होऊन दुग्धव्यवसायावर परिणाम झाले आहे. यामुळेच पशुविभागाकडून मागील पंधरवड्यात जनावरांना चाºयासाठी मका बियाणे वाटप करण्यात आले आहे. पुढे शेतकºयांसाठी पंचायत समिती कृषी विभाग श्रीवर्धन मार्फत भाजीपाला बियाणेचे वाटप करण्यात येणार आहे.
- बी. एल. कांबळे, कृषी अधिकारी,
पंचायत समिती श्रीवर्धन

जनावरांसाठी पोषक खाद्य नाही
उदासीनता हा मुख्य अडसर तालुक्यातील शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. बºयाच शेतकºयांना शासनाच्या योजनांची अद्याप नावेही माहित नाहीत. श्रीवर्धनसह दक्षिण रायगडमध्ये सध्या सुरती, मुरा, पंढरपुरी जातीच्या म्हशी दिसतात, तसेच जर्सी, एचएफ जातीच्या गायीसुद्धा आहेत.
या जनावरांसाठी येथे पोषक खाद्याची उपलब्धता होत नाही. या म्हशी किंवा गायी एकावेळी ५ ते ७ लिटर दूध देतात. त्यांचे व्यवस्थित संगोपन झाल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकते.
तालुक्यात पाण्याची ही मुबलकता आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्याचा दुग्ध व्यवसायास मोठा हातभार लागू शकतो. शेतकºयांना याबद्दल सखोल मार्गदर्शन होताना दिसत नाही. असे झाल्यास नक्कीच एक दिवस धवलक्रांती सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. यात शासन आणि शेतकºयांत उदासिनता प्रकर्षाने जाणवते.

Web Title: In Srivardhan, the dairy farming business is affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड