शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एनडीआरएफ बेसकॅम्पच्या हालचालींना वेग; नैसर्गिक आपत्तींना तोंड देणं शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 07:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महाड : दरवर्षी होणाऱ्या दरड दुर्घटना, भूस्खलन, महापूर, इमारत दुर्घटना पाहता महाड येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प ...

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : दरवर्षी होणाऱ्या दरड दुर्घटना, भूस्खलन, महापूर, इमारत दुर्घटना पाहता महाड येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प करण्याचे शासनाचे नियोजन आहे. यासाठी पाच एकर जागाही हस्तांतरीत करण्यात आली आहे. नुकतीच एनडीआरएफ पुणे विभागाकडून एक पथक पाठवून या नियोजित जागेची पाहणी करण्यात आली आहे. 

महाड शहरातील शासकीय दूध डेअरी ही अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या अवस्थेत होती. ही दूध डेअरीची पाच एकरच्या आसपास जागा   शासनाने एनडीआरएफला कायदेशीररीत्या हस्तांतरितही केली. परंतु, यानंतर दोन वर्षांत याविषयी म्हणावी तशी गतिशील हालचाल दिसून येत नव्हती. हा बेसकॅम्प कधी होणार, कधी या कामाला गती मिळणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली असताना गुरुवारी एनडीआरएफ पुणे विभागाकडून एक पथक पाठवून या नियोजित जागेची रीतसर पाहणी केली.

एनडीआरएफ पुणे येथील असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालय महाड यांच्या सहकार्याने या संपूर्ण जागेची नियम, निकषानुसार पाहणी केली. शासनातर्फे आपण नियमानुसार आवश्यक जागा एनडीआरएफ संस्थेला बेसकॅम्पसाठी कायदेशीररीत्या हस्तांतरित केली. त्यांच्या नियम, अटी आणि निकषाप्रमाणे  पाहणी होणे आवश्यक होते आणि त्या उद्देशानेच ही जागेची पाहणी करण्यात आली, अशी माहिती निखिल मुधोळकर यांनी दिली.

रायगड, रत्नागिरीसाठी हा कॅम्प महत्त्वाचा महाडमध्ये होणाऱ्या बेसकॅम्पचा उपयोग केवळ महाड तालुक्यासह संपूर्ण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आपत्ती काळात तत्परतेने बचाव पथक आणि मदतकार्य पोहोचवण्यासाठी होणार आहे. त्यामुळे जलदगतीने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे.

पाहणी अहवाल आल्यानंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार इमारतीचा आराखडा आणि बांधकाम याविषयीचे धोरण अवलंबले जाईल. आवश्यक असणाऱ्या हेलिपॅडसाठी याआधीच जागा सुनिश्चित केली. ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील.    - ज्ञानोबा बाणापुरे, प्रांताधिकारी, महाड