विशेष तहकूब ग्रामसभेत गदारोळ

By Admin | Updated: May 6, 2016 01:18 IST2016-05-06T01:18:44+5:302016-05-06T01:18:44+5:30

येथील ग्रामपंचायतीची विशेष तहकूब ग्रामसभा बुधवारी (४ मे) ग्रामपंचायतीच्या बच्चूभाई मुकादम सभागृहात सरपंच सोनाली मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र या सभेतही

Special indictment in Gram Sabha | विशेष तहकूब ग्रामसभेत गदारोळ

विशेष तहकूब ग्रामसभेत गदारोळ


रेवदंडा : येथील ग्रामपंचायतीची विशेष तहकूब ग्रामसभा बुधवारी (४ मे) ग्रामपंचायतीच्या बच्चूभाई मुकादम सभागृहात सरपंच सोनाली मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र या सभेतही आंग्रेनगरमधील झोपडपट्टीसंदर्भात विषय गाजला. यावेळी सभागृहात गदारोळ झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले, त्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरु वात झाली.
सभेच्या कामकाजाला सुरुवात कार्यक्र म पत्रिकेनुसार झाली. ग्रामविकास अधिकारी नरदास ठाकूर यांनी राष्ट्रीय पंचायत दिनाचे महत्व आणि ७३वी घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थानमध्ये झालेले बदल याविषयी सविस्तर माहिती सभागृहाला दिली. चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधीच्या खर्चाचे नियोजन ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे. आमचा गाव आमचा विकास या योजनेत पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनी दुरुस्ती, चौकाचे सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्त्यावर गटार योजना आदि कामे सुचवणे सुरू असताना सभागृहात गोंधळ सुरू झाला. मुख्य विषय गाजला तो आंग्रेनगरमधील झोपडपट्टीसंदर्भात यावेळी अध्यक्षांनी सभागृहातील चर्चा शांततेत होण्यासाठी एका वेळी एकच व्यक्तीने बोलावे असे आवाहन केले, परंतु गदारोळ सुरू राहिल्याने अखेरीस आठ पोलिसांनी सभागृहाचा ताबा घेतला त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरूवात झाली. मच्छिमारी बांधवांना समुद्र किनाऱ्यावर रेती व्यवसायामुळे मच्छी वाळत टाकण्यासाठी जागा नाही यासाठी मच्छिमारांना तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सरपंचांनी यात लक्ष घातले जाईल असे सांगितले. शासकीय पातळीवर आंग्रेनगरला गावठाण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सभागृहात मागील पत्र वाचनाने लक्ष वेधण्यात आले. (वार्ताहार)

Web Title: Special indictment in Gram Sabha