सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची तुरळक गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 23:16 IST2020-09-09T23:16:33+5:302020-09-09T23:16:39+5:30
निसर्गसौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुड तालुक्याला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची तुरळक गर्दी
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सवतकडा येथील धबधबा पर्यटकांचे व स्थानिकांचे खास आकर्षण ठरत आहेत. राज्य शासनाने ई-पास रद्द केल्यामुळे मुरुडमध्ये तुरळक पर्यटक दिसून येत आहेत. ठाणे व पनवेल येथील पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.
निसर्गसौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुड तालुक्याला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. फेसाळणारे धबधबे, धुक्याच्या पाठशिवणीत पावसाची रिपरिप, गार वारा, घाट व डोंगरातून अनेक ठिकाणी पाण्याच्या पडणाºया धारा अशा सगळ्या रोमांचकारी क्षण अनुभवण्यास पर्यटक मुरुडमध्ये येतात, परंतु सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटनावर
बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने पर्यटक वस्थानिकनागरिक सवतकडा धबाधब्यावर आनंद घेताना दिसत आहेत.
येथे आलेल्या पर्यटकांना वाहने उभी करण्यापासूनच समस्येला सुरुवात होत आहेत. परिणामी मुरु डच्या विकासासाठी शासनाने विशेष पॅकेजची तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावा, येथे येणाºया पर्यटकांच्या सोईसुविधाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष द्यावे, जेणेकरून पर्यटकांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, अशी मागणी श्रीराम जामकर, ओमकार चोडणेकर, ओमकार पोतदार व अंकिता भाटकर यांनी केली आहे.
च्धबाधबावर जाण्यासाठी वावडुंगी गावापासून ३ किलोमीटर अंतर असून, मुरुडपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता जंगलातून असल्याने पायपीट करावी लागते. या पर्यटन स्थळांचा सर्व सुविधायुक्त विकास व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून पर्यटनप्रेमींकडून होत आहे. या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.