अद्यापही काही शेतकरी भरपाईपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:35 IST2020-11-27T00:35:42+5:302020-11-27T00:35:56+5:30
यामध्ये प्रामुख्याने अन्याय झाला तो माणगाव तालुक्यातील एका अत्यंत गरीब कुटुंबातील बागायतदार शिवराम श्रीपत पोटले यांच्यावर. श्रीपत पोटले यांचे मौजे नळेफोडी येथे सर्व्हे नंबर २३/३ मध्ये ०४.५८ क्षेत्र असून त्यामध्ये १० आंबा कलमे, १० कोकम आणि ७० काजू असलेली बाग आहे.

अद्यापही काही शेतकरी भरपाईपासून वंचित
म्हसळा : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांना जबरदस्त तडाखा दिल्याने अनेक शेतकरी आणि बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले. परंतु आजतागायत काही बागायतदारांना नुकसानभरपाई तर सोडाच अजून साधा पंचनामाही संबंधित विभागातील कर्मचारी अगर अधिकारी यांनी केलेला नाही.
यामध्ये प्रामुख्याने अन्याय झाला तो माणगाव तालुक्यातील एका अत्यंत गरीब कुटुंबातील बागायतदार शिवराम श्रीपत पोटले यांच्यावर. श्रीपत पोटले यांचे मौजे नळेफोडी येथे सर्व्हे नंबर २३/३ मध्ये ०४.५८ क्षेत्र असून त्यामध्ये १० आंबा कलमे, १० कोकम आणि ७० काजू असलेली बाग आहे. ३ जून २०२०च्या निसर्ग चक्रीवादळात ही झाडे पूर्णपणे जमिनीतून उखडली गेली. त्यामुळे बागायतदार पोटले यांचे अतोनात नुकसान झाले असून पोटले यांनी वारंवार माणगाव तहसील कार्यालयात जाऊन चौकशी केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने बागायतदार पोटले यांनी ‘लोकमत’कडे आपली व्यथा मांडली. नुकसानभरपाई सोडाच परंतु साधा पंचनामा करण्यासाठीही कोणी फिरकला नसल्याचे त्यांनी सांगितले.