शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संस्थांचा मदतीचा हात

By admin | Updated: April 18, 2017 06:46 IST

कर्जत तालुक्यात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आदिवासी बांधवांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात जवळपास २५ ते ३० आदिवासी वाड्या आणि गावांना

नेरळ : कर्जत तालुक्यात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आदिवासी बांधवांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात जवळपास २५ ते ३० आदिवासी वाड्या आणि गावांना संभाव्य पाणीटंचाईच्या झळा पोहचत आहेत. त्यामुळे त्याचे नियोजन करण्यासाठी स्थानिक आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई निवारण आराखडा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्याचा तक्र ारी निवारण आराखडा मंजूर करण्यात आला. मात्र शासनाकडून टँकरमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यास विलंब होत असल्याने काही सामाजिक संस्थांनी स्वत:हून पुढाकार घेत स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामध्ये या आदिवासी वाड्यांमध्ये सामाजिक संघटनेच्या माणुसकीचे झरे पाहायला मिळत आहेत.कर्जत तालुक्यात उल्हास नदी, चिल्हार नदी आणि बारमाही वाहणारी पेज नदी आहे. तालुक्यात खांडस, काशेळे, आर्ढे, वरई, जांमरु ंग असे पाझर तलाव आहेत. मात्र यातील एक दुसरा पाझर तलाव सोडला तर बाकीचे तलाव एप्रिल महिन्याच्या आत खोली गाठतात. तसेच कर्जतपासून जवळच पाली भूतिवली धरण आहे. परंतु या धरणाच्या कालव्याचे काम रखडल्याने या परिसरातही पाणीटंचाईची झळ बसत आहे. दरवर्षी विशेष मार्चपासूनच पाणीटंचाईची झळ या परिसरातील आदिवासी वाड्यापाड्यांना बसत आहे. याचे कारण म्हणजे आजही या आदिवासी वाड्यांमध्ये पाणी योजना पोहोचल्याच नाहीत.काही ठिकाणी काम हाती घेतले आहे, परंतु ते अर्धवट आहे. परिणामी या वाड्यांमधील नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी भर रखरखत्या उन्हात डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बंगरवाडी, मालेगाव, ताडवाडी, जांभूळवाडी, मोग्रज, धामणी मोरेवाडी अशी सुमारे २५ ते ३० गावे व आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. नुकतेच तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनासाठी कर्जत-खालापूर आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली, तहसीलदार अविनाश कोष्टी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे.दरवर्षी जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच आमदार व खासदार निधी आदी शासनाच्या विविध योजनांमधून पाणीटंचाई निवारणासाठी निधी वापरला जातो. तरीही कर्जतमध्ये आदिवासी वाड्यापाड्यांमधील पाणीटंचाई कायम आहे. (वार्ताहर)