शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश; महत्वाची जबाबदारी मिळणार, शिंदे समर्थक आमदाराचे टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 20:19 IST

ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील स्नेहल जगताप यांना मिळणार आहे. 

महाड : महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या महाड येथील आजच्या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेश केला. आता ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील स्नेहल जगताप यांना मिळणार आहे. 

सभेदरम्यान ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते अनंत गिते यांनी स्नेहल जगताप यांचा परिचय करुन देताना त्यांचा पक्ष प्रवेश झाल्याचे जाहीर केले. यावेळी महाडचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे अनंत गिते यांनी सांगितले. त्यामुळे स्नेहल जगताप यांच्या पक्ष प्रवेशाद्वारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भरतशेठ गोगावले यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतील. 

दरम्यान, स्नेहल जगताप म्हणाल्या की, "माझ्या कुटुंबियांसह आणि हितचिंतकांसह आम्ही ठाकरे गटात प्रवेश करत आहोत. आज या सभेच्या निमित्ताने सांगते की, या मतदारसंघात केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल. या मतदारसंघातील जनतेने आता ठरवले आहे. या शहराने मला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. निवडणुकांदरम्यान दिलेल्या आश्वासानानुसार मी ९० टक्के कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे."

भरत गोगावलेंच्या अडचणी वाढणार?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार भरत गोगावले यांची साथ होती. आता उद्धव ठाकरे यांना स्नेहल जगताप यांच्या रुपाने विधानसभेसाठी उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे स्नेहल जगताप यांना उमेदवारी देत भरत गोगावलेंपुढे अडचणी निर्माण करु शकतात.

स्नेहल जगताप कोण आहेत?महाडचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या स्नेहल जगताप या कन्या आहेत. माणिकराव जगताप यांच्या विचारांचा मोठा मतदार रायगडमध्ये आहे. घरातून राजकीय वारसा लाभला असल्याने स्नेहल जगताप यांचा पक्ष प्रवेश ठाकरेंसाठी फायदेशीर ठरणार आहे. स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस