कच्छि,पटेल मोहल्ला येथील झोपडपट्टी धारकांचा पालिकेवर मोर्चा
By वैभव गायकर | Updated: November 7, 2023 13:38 IST2023-11-07T13:37:37+5:302023-11-07T13:38:24+5:30
16 लाखांची घरे अडीच लाखांत उपलब्ध करून द्यावी, अशी केली मागणी

कच्छि,पटेल मोहल्ला येथील झोपडपट्टी धारकांचा पालिकेवर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेल कच्छि, पटेल मोहल्ला येथील झोपडपट्टी धारकांनी ७ तारखेला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. प्रधानमंत्री आवास योजनेला विरोध म्हणून शेकडो झोपडपट्टीधारकांनी ही धडक दिली. पीएमवाय अंतर्गत सुमारे दोन हजार घरे या ठिकाणी बांधली जाणार आहे. मात्र या घरांना 16 लाखांची किंमत आम्ही कुठून देणार असा प्रश्न अय्याश शेख यांनी उपस्थित केला आहे. ही घरे आम्हाला 2.5 लाखात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या झोपडपट्टीधारकांनी केली आहे.
यावेळी पालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.पालिकेच्या शिष्टमंडळाने या झोपडपट्टी धारकांची भेट घेत या झोपडपट्टी धारकांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला.घरे खाली करण्यासाठी या झोपडपट्टी धारकांना देऊ केलेले 4 हजार रुपये अपुरे असल्याचे मत या झोपडपट्टी धारकांची आहेत.