सहा जणांना अटक
By Admin | Updated: May 3, 2017 06:03 IST2017-05-03T06:03:50+5:302017-05-03T06:03:50+5:30
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन शेळके यांच्यावर शुक्र वारी सायंकाळी ७ च्या सुमारास

सहा जणांना अटक
नेरळ : कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन शेळके यांच्यावर शुक्र वारी सायंकाळी ७ च्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी कर्जत पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य राहुल विशे यांच्यासह अन्य दहा जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सहा आरोपींना नेरळ पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी व अन्य तीन आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील आर्ढे येथे ‘गोल्डन वन’ साइट सुरू आहे. या साइटवर पाषाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन शेळके यांना कंपनीने बांधकामाचे मटेरियल सप्लायर्सचे काम दिले आहे. शुक्र वार पाषाणे गावातील २० ते २५ माणसे या कंपनीमध्ये त्यांच्या गाड्या भाड्याने लावण्यासाठी आले होते. त्यानंतर कर्जत पंचायत समितीचे सदस्य राहुल विशेही तेथे आले. तेव्हा राहुल विशे व त्यांच्यासोबत असलेले २० ते २५ जण आणि सचिन शेळके यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली होती. राहुल विशे यांनी सचिन शेळके यांच्या डोक्यात वीट मारून जबर दुखापत केली. त्यानंतर त्यांना डिकसळ येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या मारहाणी प्रकरणी कर्जत पंचायत समितीचे सदस्य राहुल विशे यांच्यासह दहा जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील संकेत सावंत, नीलेश येवले, स्वप्निल येवले, गुरुनाथ विशे, सचिन झांजे, कृष्णा उर्फ विकी रवींद्र विशे सर्व राहणार पाषाणे या सहा जणांना नेरळ पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली असून, यातील मुख्य आरोपी व अन्य तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)