शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल यंत्रणेसाठी २० लाखांचा निधी, वाहतूककोंडी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:04 IST

शहरात वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकचालकांना लगाम बसणार आहे.

अलिबाग : शहरात वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकचालकांना लगाम बसणार आहे. काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र, ती फेल ठरली होती. आता पुन्हा नव्याने ती बसवण्यात आली आहे.अलिबाग नगरपालिकेच्या प्रस्तावानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी सुमारे २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यानुसार शहरातील महावीर चौक आणि अशोका सेंटर येथील चौक या दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा सौरविजेवर कार्यान्वित केली जाणार आहे. सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याबाबतच्या प्राथमिक चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत.लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या तंत्रज्ञांकडून या यंत्रणेची पाहणी केल्यानंतर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणाºया अलिबागमध्ये हजारो वाहने येत असतात. शनिवारी, रविवारी पर्यटकांच्या वाहनांची भर पडते. अरुंद रस्ते आणि वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. बेशिस्त वाहन चालकांमुळे आणि सहाआसनी रिक्षाने यात अधिक भर पडते. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक नियमनच्या दृष्टिकोनातून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार आहे. यानंतर वाहतुकीचे योग्य नियमन होत आहे की नाही, यावर पोलीस देखरेख करणार आहेत. या सिग्नल व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल. वाहतुकीचे योग्य नियमन होईल, असा विश्वास अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस