शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:58 IST

Shrivardhan Assembly Election 2024 Result Live Updates: राज्यातील पहिला निकाल हाती आला असून श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे. 

Vidhan Sabha Election 2024 Result Live NCP Aditi Tatkare ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, सत्ताधारी महायुतीचा दणदणीत विजय होत असल्याचं चित्र आहे. राज्यातील २८८ पैकी २२० हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली असून महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा समान करावा लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील पहिला निकाल हाती आला असून श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे. 

आदिती तटकरे यांनी १५ व्या फेरीअखेर ५४ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. आदिती तटकरे यांनी ७७ हजार ४३८ मते घेतली असून त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनिल नवगणे यांना अवघी २१ हजार १३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे आदिती तटकरे यांचा विजय होणार, हे निश्चित झालं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयामागे सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांचाही ही योजना राबवण्यात हातभार होता. त्यामुळे लाडक्या बहि‍णींनी आदिती तटकरेंचा विजय निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं दिसत आहे.

दरम्यान, भाजपच्या १२५ जागा, शिवसेनेच्या ५५ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३५ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे.  मविआतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १३ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १७ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस २१ जागांवर आघाडी आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Aditi Tatkareअदिती तटकरेshrivardhan-acश्रीवर्धनthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024