शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर; खासगी वाहतुकीची लुटमार थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 23:32 IST

लालपरी सर्वसामान्यांच्या सेवेत: श्रीवर्धन आगार सज्ज

संतोष सापतेश्रीवर्धन : गौरी-गणपतीला गावी आलेल्या गणेशभक्ताच्या परतीच्या प्रवासासाठी श्रीवर्धन आगार सज्ज झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बहुसंख्य लोक कामधंदा व नोकरीनिमित्त बोरीवली, नालासोपारा, भांडुप, मुंबई आणि उपनगरामध्ये वास्तव्य करून आहेत. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त आलेल्या सर्व भाविकांना पुन्हा त्याच्या कामगिरीवर हजर होण्यासाठी श्रीवर्धन आगारातून आगामी पाच दिवस जवळपास सहा हजार किमीची जादा वाहतूक नियमित करण्यात येणार आहे.

जिल्हाबाह्य वाहतुकीला राज्य सरकारने मान्यता दिली असून, पुणे सकाळी ५, सातारा सकाळी ५.४५, नालासोपारा सकाळी ७, दुपारी १, बोरीवली सकाळी ८.३०, ११, मुंबई सकाळी ४, ५, ८, ११.४५, तसेच दिघीवरून सकाळी ४, रात्री ८ वाजता या नियमित फेऱ्या चालविण्यात येणार आहेत, तसेच ग्रामीण भागातील गावगाडा पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून तोरडी वस्ती, माणगाव वस्ती, कुडा वस्ती, नानवेल वस्ती, दिघी वस्ती या रात्रवस्तीच्या बसेस सुरू केल्याचे आगार प्रमुख तेजस गायकवाड यांनी सांगितले. श्रीवर्धन आगारातील वाहतूक निरीक्षक शर्वरी लांजेकर, वाहतूक नियंत्रक दीपक जाधव, कार्यशाळा प्रमुख प्रदीप विचारे यांनी जादा वाहतुकीसाठी धोरणात्मक भूमिका घेत, जास्तीतजास्त प्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून बसेसचे वेळापत्रक तयार केले आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी बोर्लीपंचतन, म्हसळा, श्रीवर्धन या सर्व ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्षाची सुयोग्य मांडणी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्य सरकारच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून श्रीवर्धन आगारातील प्रवाशी वाहतूक बंद होती. त्यावेळी अनधिकृत खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लुटमार केली. बोर्ली ते आदगाव ४०० रुपये, तसेच बोर्ली ते सर्वा ६०० रु. प्रति फेरी प्रवास भाडे आकारले गेले. म्हसळा-मादाटने ६० रु. प्रती व्यक्ती. श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील कारविणे, गडबवाडी, कोलमांडला, तळवडे, कोन्दरी, पानवे, केल्टे, सांगवड, रुद्रावट, गाणी, कोलवट, भापट, रोहिणी, तुरबाडी, काळसुरी, वारळ, चिरगाव या सर्व आडमार्गावर एसटी बंद असल्याने, अनधिकृत खासगी वाहतूकदाराने आवाच्या सव्वा प्रवासभाडे आकारले.जनतेला माफक दरात प्रवासी वाहतूक देण्यासाठी एसटी प्रशासन कटिबद्ध आहे. ज्या मार्गावर ती प्रवासी असतील, त्या मार्गाला प्राधान्यक्रम दिला जाईल. जनतेने सहकार्य करावे, ही विनंती. - तेजस गायकवाड, आगार प्रमुख, श्रीवर्धनआमच्या तोराडी मार्गावरील एसटी वाहतूक बंद होती, त्यावेळेस दळणवळणाचा प्रचंड त्रास झाला. आमच्या मार्गावरील वाहतूक सुरू केल्याबद्दल एसटी प्रशासनाचे आभार. - जनाब कौचाली, रहिवासी पांगळोलीबोर्लीपंचतन वाहतूक नियंत्रण कक्षात मॅन्युअली तिकीटविक्री सुरू आहे. ग्रामीण भागात उत्तम सेवा देण्यासाठी एसटी सज्ज आहे.- रवींद्र मोरे, वाहतूक नियंत्रक, बोर्लीपंचतनमी नियमित आदगाव ते बोर्लीपंचतन प्रवास करतो. एसटी बंद होती, त्यावेळी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एसटी सुरू झालेली आहे. त्यामुळे आनंद झाला आहे. - गजानन विलनकर, रहिवासी आदगाव

टॅग्स :state transportएसटीGanesh Mahotsavगणेशोत्सव