खारघरमध्ये चड्डी बनियान गँगची दहशत
By वैभव गायकर | Updated: July 14, 2024 19:45 IST2024-07-14T19:45:00+5:302024-07-14T19:45:21+5:30
खारघर शहरातील सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

खारघरमध्ये चड्डी बनियान गँगची दहशत
वैभव गायकर,पनवेल: खारघर शहरातील पेठ गावात दोन दिवसापूर्वी गावात शस्त्रधारी चार चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत.हातात कोयते घेऊन फिरणारे हे चोरटे सीसीटीव्ही कैदय झाले असुन त्याठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दि.12 रोजी मध्यरात्री चार चोरटे गावात फिरत होते.यावेळी काही घरांचे कडी कोयंडे तोडून या चोरटयांनी घरातील पैसे लंपास केल्या आहेत.काही दिवसापूर्वी कळंबोली शहरात देखील गुरुविहार निवासी संकुलात अशाच पद्धतीने दोन चोरटे शिरले होते.खारघर शहर अत्यंत सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात असताना अशापद्धतीने शस्त्रधारी चोरटे सर्रास मोकाट फिरत असल्याने खारघर शहरातील सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.