शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

शिवसेनेचे तीन सभापती तर एक सभापती पद आघाडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:58 IST

मुरुड नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड

n  लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : कोरोनाच्या पाश्वभूमीवर व्हिडोओ काॅन्फरन्सिंगद्वारे मुरुड नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापती सदस्यांची निवड मंगळवारी सकाळी मुरुड नगरपरिषदेच्या डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली. मुरुडचे तहसीलदार तथा या निवडणूक प्रक्रियेचे पीठासन अधिकारी गमन गावित यांच्या मार्गदर्शानाखाली संपन्न झाली.मुरुड नगरपरिषदेत चार सभापती पदे आहेत. त्यापैकी तीन सभापती पदे शिवसेनेला, तर एक महिला व बालकल्याण सभापतीपद काँग्रेस राष्ट्रवादी व शेकाप आघाडीला मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. यावेळी सभागृह गटनेते मुग्धा जोशी यांनी आपल्या पक्षाकडून ४ सभापतीपदांसाठी व समिती सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. बांधकाम व दिवाबत्ती सभापती मेघाली महेश पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती पांडुरंग कृष्णा आरेकर, पर्यटन व नियोजन समिती सभापती युगा योगेश ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज एकमेव आल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे पीठासन अधिकारी गमन गावित यांनी घोषित केले. यावेळी मुख्याधिकारी अमित पंडीत व नायब तहसीलदार रवींद्र सानप, कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, वरिष्ठ लिपिक नरेंद्र नादगांवकर आदी उपस्थित होते. आरोग्य व शिक्षण समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष नौसिन मुजफ्फर दरोगे, अशोक गणपत धुमाळ, विजय शंकर पाटील, अविनाश रामचंद्र दांडेकर, रिहाना इब्राहिम शहाबंदर. बांधकाम व दिवाबत्ती समिती सभापतीपदी मेघाली महेश पाटील, मुग्धा राजन जोशी, प्रमोद दत्तात्रेय भायदे, विश्वास बाबाजी चव्हाण, आशिष अरुण दिवेकरपाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पांडुरंग कृष्णा आरेकर, प्रमोद दत्तात्रेय भायदे, मुग्धा राजन जोशी, अविनाश रामचंद्र दांडेकर, विश्वास बाबाजी चव्हाण. पर्यटन व नियोजन समिती सभापतीपदी युगा योगेश ठाकुर, अ. रहिम अ.हमीद कबले, अशोक गणपत धुमाळ, मंगेश मधुकर दांडेकर, मनोज हरिश्चंद्र भगत. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी आरती गुरव व उपाध्यक्षपदी प्रांजली मकू, अनुजा दांडेकर, आरती गुरव, वंदना विनायक खोत समिती सभापती सदस्यपदी निवड झाली. स्थायी समिती अध्यक्षा नगराध्याक्षा स्नेहा किशोर पाटील तर सदस्यपदी, उपनगराध्यक्ष नौसिन मुजाफ्फर दरोगे, मेघाली महेश पाटील, पांडुरंग कृष्णा आरेकर, युगा योगेश ठाकुर, आरती श्रीकांत गुरव यांची निवड करण्यात आली.सभापतींनी पदभार स्वीकारले नागरिकांनी दिलेल्या सत्तेचा जनतेच्या विकासासाठीच उपयोग करणार असल्याचे मत राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या महिला व बाल कल्याण समिती सभापदी आरती गुरव व शेतकरी कामगार पक्षाच्या प्रांजली मकू यावेळी यांनी व्यक्त केले.